केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी चर्मकार मान्यवरांच्या गाठीभेटी.


अखिल भारतीय धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुकदेवजी महाराज यांनी केद्रींय मंत्री मा.ना.नितिनजी गङकरी यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगी संत रविदास महाराज यांची प्रतिमा देऊन संन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.संजय खामकर तसेच राष्ट्रीय सचिव मा.विठ्ठल जावदे यांनी संत रविदास महाराज यांचे प्रचार प्रसार विषयी विश्वात चाललेले अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनच्या माध्यमातून कार्य विषयी सविस्तर माहिती देऊन चर्चा झाली.

- संत रविदास महाराज तिसरे धाम कात्रज विकास व विस्तार होणे बाबत.
- मा.सुकदेवजी महाराज यांच्या सुरक्षा बाबत.
- संत रविदास महाराज यांचे महाराष्ट्रात होणारे विश्व साहित्य संमेलन निमंत्रीत विषयी.
- संत रविदास महाराज तिसरे धाम वर्धापण दिनाचे प्रमुख अतिधी म्हणुन उपस्थिती निमंत्रण.
- संत रविदास महाराज यांचे महाराष्ट्रात विश्वविद्यालय स्थापना संदर्भात सविस्तर चर्चा
अशा विविध सामाजिक विषयावर एक तास सविस्तर चर्चा झाली.
वरील विषयी अखिल भारतीय धर्म संघटनच्या समिती समवेत सकारात्मक चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

मा.ना.नितिनजी गङकरी साहेब यांनी समितीस महत्वपुर्ण एक तास चर्चा करतांना समितीस मार्गदर्शन करतांना समाजाचा सार्वंगीन विकास होणे महत्वाचे असतांना युवकांनी विविध स्तरातील जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करावा व उच्च दर्चाचे तांत्रिक प्रशिक्षण घेवुन सुक्ष्म लघु उद्दोगाकङे तसेच लेदर इंङस्ट्री मध्ये आपले कर्तृत्व सिध्द करावे.
या करिता शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. या करिता नेहमीच मार्गदर्शक व सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन मा.गङकरी साहेबांनी दिले.
अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनच्या कार्याची प्रशंसा करतांना अभिनंदन करुन समितीच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्यात.
प्रसंगी खालील पदधिकारी डॉ. भाऊ दायदार ,फुलचंद मालाधारी ,मधुकरजी चापके, योगेश पाचपोर,राजेश उंबरकर ,अशोकराव भागवतकर, दिनेश सोनेकर, लीलाधर कानोडे ,अशोक जोनवाल ,प्रा.भगवान गायकवाड ,दिपक कांबळे ,रामचंद्र ठोंबरे , नाना बसवेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.