महत्वाची बातमी : MPSC चा अभ्यास क्रमाबाबत हा महत्वपूर्ण बदल. पहा सविस्तर.
विद्यार्थ्यांना आपल्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी ते मेहनत घेत असतात. अगदी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. एमपीएससीच्या मार्फत या स्पर्धा परीक्षा होत असतात. आणि यातून सरकारी नोकरीची मोठी संधी असते.
मात्र आता नवीन पॅटर्नमुळे उमेदवारांच्या सरकारी नोकरीच्या संधी कमी होतील, अशी शंका उपस्थित होण्यास सुरुवात झालीय. कारण विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षांमधील नवीन पॅटर्न हा घातक ठरत असल्याचं उमेदवारच म्हणतात. त्यासाठी उमेदवारांनी आंदोलन देखील छेडली होती, मात्र आयोगानं थेट कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती मिळाली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांमध्ये अनेकदा सरकारी नोकरदार भरती होतात.
मात्र या स्पर्धा परीक्षांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता एमपीएससीच्या आता दोनच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत मात्र या पूर्व परीक्षेच्या आधारावरती निर्णय निरनिराळ्या विभागात आपल्या इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत. राजपात्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर राजपात्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा एम सी क्यू मध्ये असणार आहेत.
नवीन पॅटर्नमुळे उमेदवारांच्या सरकारी नोकरीच्या संधी कमी होतील यात शंका उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे एमपीएससी परीक्षा मधील हा नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांना घातक ठरू शकतो. कारण की आतापर्यंत विद्यार्थ्यांनी एमसीक्यूच्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्यामुळे यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होणार अभ्यासाची पद्धत बदलणं त्यामुळे उमेदवारांच्या संध्या कमी होतील असे विद्यार्थ्यांचा म्हणण.