क्षणात होत्याच नव्हत झालं; स्लायडिंग गेटवर खेळताना 5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडला धक्कादायक प्रकार.
लहान मुलं म्हटलं की त्यांचं खेळणं – बागडणे आलंच. लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला आवडत असतात. अनेक वेळेस ही मुलं नकळतपणे अशा काही प्रकारचे खेळतात की, त्या खेळामुळे त्यांचा अगदी जीवही जाऊ शकतो आणि याबाबत बऱ्याच वेळेस घरच्यांना थोडी देखील कल्पना नसते की, त्यांचं मूल बाहेर खेळत असून त्यासोबत अशा काही घटना घडतील. त्यामुळे ते कुटुंब त्या मुलाला गमावून बसेल. कित्येकदा क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. अशाच घटना आपण दैनंदिन बातम्यांमध्ये पाहत- ऐकत असतो. अशाच प्रकारची एक घटना नागपूर मध्ये घडली आहे अतिशय धक्कादायक असा प्रकार या ठिकाणी घडला आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, एका गेटचा नट निघाल्यामुळे एका चिमुकल्याचा त्या ठिकाणी जीव गेलाय. सदरील मुलगा हा घराच्या अंगणात असलेल्या स्लाइडिंग गेटवर खेळत होता अंगणामध्ये गेट सोबत खेळत असताना ही घटना घडली आहे. या मुलाचे नाव रियांश असे आहे पाच वर्षाचा असून घरासमोरील अंगणात असणाऱ्या गेट सोबत झुलत असताना या गेटचा लोखंडी नट निघाला. हा लोखंडी खिळा निघाल्यानंतर तो गेट रियांशच्या अंगावर पडला आणि या अवजड लोखंडी गेटमुळे रियांश गंभीर जखमी झाला. त्याचा आवाज आल्यानंतर घरातले बाहेर येऊन पाहताच त्याच्या अंगावर हे लोखंडी गेट पडलेले दिसले त्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रियांश ला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर रियांशला मृत घोषित केले. आपला मुलगा घराच्या अंगणामध्ये खेळत असताना त्याकडे लक्ष न दिल्यामुळे टांगले कुटुंबीयांना या चिमुकल्याला गमाव लागल आहे.
लहान मुलं ही खेळकर असल्यामुळे अश्या गंभीर घटना घडतात असतात. आणि त्या गेट जवळ गेला आणि गेटचा नट तुटल्यामुळे या रियांशच्या अंगावर गेट पडून त्याचा मृत्यू झाला. आपले मूल अंगणामध्ये खेळत असताना त्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही छोट्या गोष्टींमधून या मोठ्या गोष्टी अशा घडत असतात आणि त्यामुळे नको त्या गोष्टी आपल्या समोर येतात. सदरील घटनेमुळे टांगले कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून या घटनेमुळे या परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.