महत्वाची बातमी

मारहाण प्रकरणी आ. दाते यांच्या पुतण्यावर गुन्हा ! निलेश लंकेंकडून सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

पारनेर : प्रतिनिधी,
सुपा एमआयडीसीमध्ये काम घेतल्याच्या कारणावरून आमदार काशिनाथ दाते यांचा पुतण्या सुनील गणपत दाते याच्यासह त्याच्या इतर तीन साथिदारांनी ठेकेदारास लाकडी दांडके तसेच दगडाने बेदम मारहाण केली. ठेकेदराच्या मित्रालाही सुनील दाते याच्या टोळीने मारहाण केली.

यासंदर्भात नि लेश एकनाथ लंके यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आपल्या फिर्यादीमध्ये लंके असे म्हणतात की, सोमवार दि.२ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निलेश लंके व त्यांचा मित्र अक्षय थोरात हे दोघे नगर-पुणे महामार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपापासून अक्षय थोरात यांची कार क्र. एम एच १२ एक्सएच ६३३३ मधून एमआयडीसीतील सर्व्हिस रोडने हंगा येथे निघाले होते.

सर्व्हिस रोडने लंके व थोरात यांची कार जात असताना पाठीमागून काळया रंगाची क्रेटा कार क्र. एम एच १६ डीएस ४१११ ही थोरात यांच्या गाडीपुढे आली. कारच्या पुढे कार लाउन सागर जगन्नाथ दळवी रा. दळवी मळा हंगा व अनिकेत प्रकाश कांडेकर रा. नारायणगव्हाण हे त्यातून खाली उतरले. दोघेही निलेश लंके यांना म्हणाले की, तुइ-या कामाचा पी ओ दाखव. त्यावर तुम्ही मला पी.ओ. विचारणारे कोण असा सवाल लंके यांनी केल्याचा राग येऊन सागर दळवी व अनिकेत कांडेकर यांनी निलेश लंके व अक्षय थोरात यांना लाकडी दांडके व दगडाने मारहाण करण्यास सुरूवात केली. दळवी व कांडेकर हे लंके व थोरात यांना मारहाण करत असतानाच सुनील गणपत दाते रा. हंगा व ॠतिकेश सतिश ढवळे रा. आसामी मळा, हंगा हे दोघे पोलीस स्टेशनजवळ उभे होते ते तिथे धावत आले. चौघांनीही लंके व थोरात यांना बेदम मारहाण केली.

मारहाण सुरू असताना आरडाओरडा झाल्याने हे खूप माजले आहेत, आपण यांचा काटा काढू. आता हे एमआयडीसी मध्ये कसे काम करतात तेच आम्ही पाहू अशी दमदाटी करत चौघेही त्या क्रेटा कारमध्ये बसून पसार झाले. दरम्यान, विधीमंडळाच्या लोगोसह विधानसभा सदस्य असे लिहिलेले स्टिकर या क्रेटास लावण्यात आले होते असेही या फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.

सुपा एमआयडीसीमधील कंपनीमध्ये मारहाण करणारांपैकी दोघांचा लंके व थोरात यांच्यात वाद झाला होता.कंपनीमध्ये येऊन वाद घालू नका असे लंके व थोरात यांचे म्हणणे होते. तरीही बाचाबाची सुरू राहील्याने दोघांना मारहाण झाली. त्यातून हा प्रकार घडल्याची माहीती आहे. काल झालेल्या भांडणाच्या कारणातून आम्हाला मारहाण झाल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!