विमानात तरुणाने एअरहॉस्टेस कडे केली अजब मागणी; व्हिडियो होत आहे प्रचंड व्हायरल.
तलफ हा विषय फार गंभीर असतो एका व्यक्तीला तलफ झाली त्याने विमानात तंबाकू खाण्यास सुरुवात केली, तंबाखू खाणं हे हानिकारक आहे, गुटखा किंवा पान मसाला खाणं हे शरीरासाठी फारच हानिकारक असतं. यामुळे कॅन्सर, दमा यांसारखे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. पान मसाल्यामुळे आयुष्य उध्वस्त झालेले असे अनेक रुग्ण तुम्हाला सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळतील. मात्र तरी देखील अनेक मंडळी सर्रास गुटखा खाताना दिसतात.
अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण चक्क विमानात गुटखा थुंकण्यासाठी खिडकीची कास उघडण्याची विनंती करतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डोक्याला हातच लावा, विमानात बसलेला एक तरुण हातामध्ये काही तरी मळताना दिसतोय. जणू तंबाखू किंवा पान मसाला मळावा तसं काही तरी तो करतोय. तेवढ्यात एक एअरहॉस्टेस येते. तिला तो गुटखा थुंकण्यासाठी खिडकीची काच उघडण्याची विनंती करतो. ही विनंती ऐकताच एअरहॉस्टेस शॉक होते.
पण तेवढ्यात तो तरुण हसतो त्यामुळे तो प्रँक करतोय हे तिच्या लक्षात येतं. मग काय ती सुद्धा प्रवाशाला हसून दाद देते. हा गंमतीशीर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.पान मसाला खाणं हे शरीरासाठी हानीकारक आहे. नियमितपणे पान मसाला खाल्ल्यानं तोंड, जीभ आणि जबड्यावर पांढरे डाग पडतात.
मग या डागांचं रुपांतर कर्करोगातही होतं. वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते पान मसाल्यामुळे श्वासामध्ये दुर्गंधी, हिरड्यांचे सुजणे, दात कमकुवत होणे, दातांवरती चित्रविचित्र डाग पडणे या समस्या उद्भवतात. अन् जर का तुम्हाला या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर पान मसाल्यापासून चार हात लांबच राहा.