संतापजनक : ” आपल्या समाजात वयात आलं कि पर पुरुषासोबत….” आईने माय लेकीच्या नात्याला काळिमा फासला.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी ऐतिहासिक आणि संतांची भूमी आहे अश्या जिल्ह्यामध्ये अशी वाईट काम केली जातात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले आहे. अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका आईसाठी तिचे मुलं म्हणजे जीव की प्राण असतात, त्यातले त्यात मुलीमध्ये ती आई स्वतःला शोधत असते, पण जेव्हा ही आईच आपल्या मुलीला वाईट कृत्य करायला भाग पाडते अशा वेळेस आई आणि मुलगी या नात्याला काळीमा फासायचं काम या ठिकाणी होत असतं.
अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यामधून समोर येत आहे, सामाजिक प्रथा या आपण पाळायच्या असतात असं सांगून एका आईने आपल्या मुलीला चक्क परपुरुषासोबत संबंध ठेवायला भाग पाडल आहे. या आईने 13 वर्ष अल्पवयीन मुलीला एका 50 वर्षीय नराधमाच्या हाती सोपवलं, त्यातच या नराधमाने सदरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. सदरील घटना राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेगाव या ठिकाणी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवी मध्ये शिकते. कोपरगाव तालुक्यामधील वेस या ठिकाणी राहणारा आरोपी भडांगे याची त्या मुलीच्या आईशी ओळख होती. त्यांचं घरी येणं जाणं देखील होतं, पंधरा दिवसापूर्वी या आईने पीडित मुलीला म्हणाली की, तू आता वयात आली आहे आणि आपल्या समाजामध्ये वयात आल्यानंतर बाहेरच्या पुरुषासोबत झोपावं लागतं. मीही तेच केलं आहे आणि आता तुलाही हे करावे लागणार आहे.
पण पीडित मुलीने आपल्याला शाळा शिकायची असून असे घाण काम मी करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर तीन-चार दिवसातच आरोपी आबासाहेब हा त्या पीडित मुलीच्या घरी आला. पिडिताच्या आईनं तिला आबासाहेब या नराधमांसोबत झोप अन्यथा तुला बघून घेईन अशी धमकी दिली. त्यावेळेस आरोपी आबासाहेब यान त्या अल्पवयीन मुलीला घरातील एका खोलीत नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
यातच तो नराधम दुसऱ्या दिवशीही घरी येणार हे कळतात घाबरलेल्या त्या अल्पवयीन मुलीन त्या गावात राहणाऱ्या आपल्या मामे भावाला भेटून ही सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मामे भावाने पीडित मुलीला आधार देऊन राहता पोलीस ठाण्यात आरोपीवर विवि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी पीडित मुलीचा आईसह नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आबासाहेब भडांगे वय वर्ष 50 असं अटक करण्यात आलेल्या त्यांना आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या मामे भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधामध्ये बलात्कारासह पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.