प्रेरणादायी : एका सलून चालकाच्या पोरीने मिळवले MPSC मध्ये यश, पास होऊन बनली RTO इन्स्पेक्टर.
आपण पाहतो कि दरवर्षी खूप मुले स्वतःला आजमावून बघण्यासाठी म्हणा अथवा स्वताला Prove करण्यासाठी MPSC ( महाराष्ट्र राज्य लोकसेवा ) परीक्षा देत असतात. यासाठी त्यांची खूप दिवसाची मेहनत, अभ्यास आणि त्यांच्या अभ्यासाबाबत असणारी चिकाटी या सगळ्याने त्यांना या परीक्षामध्ये यश मिळत असते. पुणे सारखे मोठ्या शहरामध्ये किती तरी क्लासेस यावर शिक्षण सुद्धा देत आहेत तर कित्येक मुले पुण्यामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी जात असतात.
दैनंदिन राज्यात लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देतात. मात्र, फार मोजकेच विद्यार्थी या कठिण परिक्षेतून पास होतात. दरम्यान, नुकताच राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एका सलून चालकाच्या मुलीने गगनभरारी घेत एमपीएससीची परिक्षा सर केली आहे आणि आरटीओ इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे.
या यशस्वी कन्येचे नाव सृष्टी दिवाकर नागपुरे असे आहे. ती काटोल येथील रहिवासी असून, तिच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. तसेच घरची परिस्थिती बेताची आहे. या परिस्थितीतून तिने हार न मानता सृष्टी दिवाकर नागपूरे या तरुणीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. आणि निकाल लागल्यापासून सृष्टी व तिच्या घरातले अतिशय खुश आहेत. आज तिच्या कष्टाची चीज झालेलं पाहायला मिळत आहे. तसेच तिचे स्वप्न आज पूर्ण होत आहे.
सृष्टीच्या वडिलांचे गावात छोटेसे सलून आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलींना शिकवायचे आणि मोठे अधिकारी बनवविण्याचे स्वप्न आई- वडिलांनी पाहिले. त्यांच्या पहिल्या मुलीची मागच्या वर्षी पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यानंतर धाकटीनेही अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तिने यात स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. सृष्टीने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच खासगी कंपनीत नोकरी करताना जिद्दीने वेळात वेळ काढून अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचे हे एकच ध्येय तिने ठरवले होते आणि ते तिने पूर्ण करुन दाखवले. यासाठी तिला मोठ्या बहिणीची प्रेरणा आणि आई-वडिलांचे पाठबळ मिळाले, असे आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झालेली सृष्टी नागपुरे म्हणाली आहे.