पाचोऱ्यात रंगला ” जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा. ” कार्यक्रम.

प्रतिनिधी भिकन पाटील.
स्पर्धकांच्या रंगीबेरंगी पेहराव व आभूषणांनी भरला जल्लोषला रंग पाचोरा येथे मानसिंगका मीलच्या प्रांगणात गेल्या 26 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या जागर शक्तीचा -उत्सव भक्तीचा या घोषवाक्या अंतर्गत सुरू असलेल्या गरबा दांडिया जल्लोष -2022 मध्ये बालकांपासून ते वृद्धांपर्यंत स्पर्धकांचा सहभाग कमालीचा वाढत असून स्पर्धकांचे रंगीबेरंगी पेहराव व अंगभर घातलेल्या आभूषणांनी या स्पर्धेला चांगलाच रंग भरला. उपस्थित प्रेक्षकांची साद व दाद स्पर्धकांचा उत्साह वाढवणारी ठरत आहे.
आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित दादा पाटील यांनी आयोजित केलेल्या व आशीर्वाद ईन्फ्राचे संचालक मुकुंद अण्णा बिल्दीकर तसेच एमएसपी बिल्डकॉमचे संचालक मनोज भैय्या पाटील यांनी प्रायोजित केलेल्या जल्लोष 2022 गरबा दांडिया रासच्या पाचव्या दिवशी प्रेक्षकांसह स्पर्धकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आमदार किशोर आप्पा पाटील, त्यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील ,पत्नी सुनीताताई पाटील, कन्या डॉ प्रियंका पाटील, सुमित दादा पाटील, मुकुंद अण्णा बिल्दीकर ,मयुरी ताई बिल्दीकर, आदित्य बिल्दीकर ,अनुष्का बिल्दीकर, मनोज भैय्या पाटील, वर्षाताई पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारवकर, अरुण ओझा, सुमित सावंत ,मुन्ना गौड, संदीप महाजन, भूषण पेंढारकर,राहुल पाटील, सागर शेख ,जितेंद्र काळे, धनराज पाटील, अतुल चित्ते, मनोज बडगुजर ,मंदाताई पाटील आदि उपस्थित होते.
लहान गटांच्या दांडिया राऊंडने प्रारंभ झाला. मोठा गट ,जनरल गट यांचे गरबा व दांडियाचे स्वतंत्र राउंड घेण्यात आले. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे मॅचिंग केलेल्या महिलांना ड्रॉ काढून त्यांना पैठणी देण्यात आली. तसेच आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकास कामांवर आधारित प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सुनिता पाटील, सायली पाटील, शर्वरी तांबोळी ,ज्योती पाटील, उज्वला पाटील या पैठणीच्या मानकरी ठरल्या. रामचंद्र पाटील, अनिल पाटील, विजय सोनजे, सुमेरसिंग राजपूत हे बक्षीसांचे मानकरी ठरले. स्पर्धकांनी दांडियाचे रंगीबेरंगी ड्रेस परिधान करून तसेच महिलांनी अंगभर आभूषणे घालून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
विशेष म्हणजे मोठ्या गटातील खेळाडूंनी डिजिटल लाइटिंग असलेल्या दांडिया, छत्र्या, बूट तसेच राजस्थानी पगडी, खानदेशी टोपी व फेटे बांधून आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन घडवले. त्यामुळे प्रेक्षकांनी चांगलीच साद व दाद दिली.आदिशक्ती अंबे मातेचा जयघोष, अवकाशात फटाक्यांची मनोहरी आतिषबाजी, अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने उडवला जाणारा धुराळा व रंगीबेरंगी पताका ,आकर्षक विद्युत रोषणाई व रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाची जुगलबंदी अशा प्रसन्न वातावरणात गरबा दांडिया रास रंगली विजैत्यांना आमदार किशोर आप्पा पाटील, मुकुंद अण्णा बिल्दीकर, मनोज भैय्या पाटील, डॉ प्रियंका पाटील, सुनीताताई पाटील, वर्षाताई पाटील, सुमित पाटील, आदित्य बिल्दीकर, अनुष्का बिल्दीकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. भुसावळचे निवेदक प्रकाश व प्रा सी एन चौधरी यांनी सूत्रसंचालन व स्पर्धेचे धावते वर्णन केले. सुमितदादा पाटील व ग्रीन ॲपल इव्हेंटच्या सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले.