कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये ढोल ताशांच्या लेझीमच्या गजरात दिला गणरायाला निरोप.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनीधी
गुरुवार दि.८ रोजी शाळेत सकाळी ११ वा. ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर गणरायांची मिरवणूकीत राष्ट्रीय थोर नेत्यांच्या वेशभूषेत साई बोखारे हा म.गांधी, नितेश चव्हाण हा लो.टिळक तर दक्ष देशमुख हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परीधान केले होते ही मिरवणूक शाळेच्या आवारातुन मार्गस्थ छ.शिवाजी महाराज चौक, जुना बाजार चौकातुन शालेय विद्यार्थांनी लेझीम नृत्य करत गावातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेतले त्यानंतर गावातील सोना नदीच्या तीरावर गणपती बाप्पा चे विसर्जन करण्यात आले. या मिरवणूकीत शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस एकनाथ कोलते ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ दादासाहेब पवार, प्रा.रवींद्र जाधव, निलेश पाटील, शंकर काळे, योगेश काळे, प्रणय कुलकर्णी, कमलेश काळे शितल काटोले, मनिषा पाटील, अंजली कथलकर ,शितल पवार, विद्या पाटील, ज्योती जोशी नलिनी पाटील, पुजा इंगळे, नम्रता पाटील,रोहिणी पाटील,जयश्री श्रीवास्तव पुनम मोरे, रेणुका गोसावी, संजय डापके, मुश्ताक शहा ज्ञानेश्वर पंडित आदींनी मिरवणूकीत सहकार्य केले.