कडीत बुद्रुक ग्रामपंचायत मधील कर्मचारी शिवाजी मेनगर यांचा भोंगळा कारभार आंधळ दळत कुत्रा पीठ खात.
पदाचा दुरुपयोग करून खोटे दस्तऐवज तयार करून महसूल खात्याची व ग्रामपंचायत कार्यालय व आयआयएफएल फायनान्स यांची फसवणूक केल्याबाबत त्वरित कारवाई करण्यात अन्यथा उपोषणचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश शेटे यांनी दिला आहे दि.07/08/2024 गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन दिलेली आहे
संदर्भ मौजे कडीत बुद्रुक तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ग्रामसेवक च्या हाताखालील कर्मचारी शिवाजी मेनगर यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी ग्रामपंचायतचे खोटे शिक्के खोटे दस्तऐवज खोटे दाखले खोटे कर पावत्या व असे बरेचसे खोटे दस्तवच तयार करू ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामविकास अधिकारी या सर्वांना अंधारात ठेवून स्वतःच मनमानी कारभार करून IIFL फायनान्स कडून 4 लाख 32 हजार रुपये खोट्या दस्ताऐवजावर कर्ज काढले आहे
दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केली असता असे निदर्शनात आले यांनी खोटे उतरल्यावर मोरगेज करून कर्ज काढलेले आहे माननीय सब रजिस्टर साहेब कुमावत यांनी स्वतः दखल देऊन तरीही मी आपणास विनंती करतो माझ्याकड जे डॉक्युमेंट आहे योग्य वेळी तुम्हाला सादर करेल तरी शिवाजी मेनगर यांच्या दस्तऐवजाची घराचा उतारा घरपट्टी आज पर्यंत मागील पाच वर्षाच्या घरपट्टी काढण्यात यावे
किती कर भरलेला आहे हे लगेच लक्षात येईल त्यांच्या घराचे मोजमाप केला असता असे निदर्शनात येईल त्यांचे घर तेवढे नाहीच म्हणून शिवाजी यांनी सुमारे 25 प्रकरणे असे खोटे दस्तऐवज तयार करून केलेले आहे शिवाजी मेनगर वर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करू त्यांना बडतर्फ करण्यात यावे ग्रामपंचायत मधून त्यांना काढून टाकण्यात यावे केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी
टीप दहा दिवसात योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात संघटनेमार्फत बेमुदत उपोषण करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते योगेश शेटे यांनी इशारा दिला आहे