” काय दारु…काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके. पहा बातमी सविस्तर.
शिंदे गटातील सर्वांचे आवडते झालेले, त्यांच्या एका डायलॉग ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे सध्या कुठला ना कुठल्या विधानामुळे पुन्हा चर्चेत येतात ते आपल्या सभांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला टार्गेट करायचं सोडत नाहीत आणि त्यामुळेच पाटील आणि शिवसेना यांच्यात सातत्याने शब्द युद्ध सुरूच असतं यातच आता युवा सेनेच्या माध्यमातून एक पोस्ट व्हायरल होती आहे.
त्यामध्ये पाटील यांना टोमणा देत म्हटलं ‘बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. ” काय दारु…काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके. ” बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल. आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःचं घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या’, अशी बोचरी टिका करणारी पोस्ट सोशल मीडियावर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत.
या दोन गटात बंडानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता पंढरपूर येथील युवासेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.
युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना हे चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांना अकलूजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अनेकदा टिका केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पदाधिकारी आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.