अंतर्गत वाद बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित जपावे – सामा. कार्यकर्ते तुकाराम गेरंगे
माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक या ठिकाणी दिनांक 15 2 2019 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मधल्या सुट्टीत इयत्ता आठवी व इयत्ता आठवी क या दोन्ही वर्गातील मुलांमध्ये हाणामारी सुरू झाली याचे रूपांतर नंतर चाकू सुरी ब्लेड अशा पद्धतीने हाणामारी चालू झाली यामध्ये यामध्ये ओंकार बोटे याला पाठीवर गंभीर स्वरूपाची जखम होऊन 18 टाके पडलेले आहेत. सौरभ कोतकर सात टाके पडलेले आहेत. साद शेख यालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे
यामुळे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झालेले आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी चैतन्य भोसले, जगदीश गुंजाळ, अभय खंडागळे, ओमकार कचरे या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
संस्थांतर्गत वर्षानुवर्षेचे वाद असल्यामुळे शिक्षकांतही गट तट तयार झाले आहेत. ठराविक चार-पाच शिक्षक सोडता बाकी शिक्षक वर्ग मुलांच्या शिस्तीकडे अजिबात लक्ष देत नाही असे आज पालक मेळाव्यात निदर्शनास आले तरी संस्था अंतर्गत वाद बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित पाहता पुढील काळात अशा घटना होऊ नये यासाठी पालक मेळाव्यात सूचना देण्यात आल्या.
या शाळेमध्ये शाळेमध्ये संस्थेचे वाद असल्याने माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी खास बाब म्हणून या शाळेवर कायम विस्ताराधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळा तपासणी वेळोवेळी करण्यात यावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते मानव विकास परिषदचे महाराष्ट्र युवक संघटक तुकाराम गेरंगे यांनी निवेदन देऊन केली आहे.