धारदार शस्त्र तलवार बाळगणा-या इसमाविरुध्द कोतवाली पोलीसांची कारवाई.

दिनांक 20/11/2025 रोजी 11:30 वाचे सुमारास मा. श्री संभाजी गायकवाड साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर येथे एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजुस प्राण घातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेवुन काहितरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ व पंचासह नमुद बातमीच्या ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
गुन्हे शोध पथकातील अंमलदार व पंच आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर येथे जाऊन बातमीतील नमुद इसमाचा शोध घेतला असता आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारे रोडवर गाझीनगर चौक, अहिल्यानगर एक इसम दिसुन आला त्यास जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सचिन हिंमत अवचिते वय – 21 वर्षे रा. मांदळी शीवार, ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
नमुद इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सदर इसमाच्या शर्टच्या पाठीमागील बाजुस पॅन्टमध्ये खोसलेली एक धारदार तलवार ४०००/- रु. किंमत अंमदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजुला काहीशी वक्राकार वळलेली असलेली मिळुन आली पोसई/ गणेश देशमुख यांनी पंचासमक्ष नमुद तलवार जप्त केली नमुद इसमास कारवाई कामी कोतवाली पोलीस स्टेशनला त्याच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार तलवारीसह आणण्यात आले असुन त्याचे विरुद्ध पोकॉ/ पोकॉ/ 1553 शीरीष बाळासाहेब तरटे यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोस्टे गुरनं 1060 / 2025 शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेकॉ / 109 डी. बी. दौड हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ धार्गे सो. अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे, सो.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. दिलीप टिपरसे सो.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, पोसई / गणेश देशमुख, पोहेकॉ / दौड, पोहेकॉ / वसिम पठाण, पोहेकॉ / विशाल दळवी, पोहेकॉ/ विनोद बोरगे पोना / वाघचौरे, सत्यम शिंदे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, राम हंडाळ, यांच्या पथकाने केली आहे.



