नगरमधील सबजेलमध्ये कायद्यांना मारहाण करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे दलित आघाडीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते रा. लालटाकी, अहमदनगर यांनी आज पोलीस अधिक्षक, अहमदनगर याना निवेदन देऊन अहमदनगर येथील मध्यवर्ती कारागृह सबजेल येथील नवीन नियुक्त झालेले मुख्य जेलर पाटील यांनी माझे मुलास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केलेबाबत कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि माझा मुलगा राजु साहेबराव काते हा भा.द.वि. कलम ३७६ या कलमाखाली अहमदनगर मध्यवर्ती कारागृह सबजेल अहमदनगर येथे बंदी आहे. त्याची केस सत्र न्यायालय (बरलिया मॅडम) ४ था मजला सेशन कोर्ट यांचे कोर्टात चौकशीवर आहे. त्याची तारीख ०२/०२/२०२३ रोजी होती.
सदर तारखेस माझे मुलाने जेलर पाटील यांचे विरुद्ध शिवीगाळ व बेदम मारहाण केल्याची तोंडी तक्रार केलेली होती. ही बाब जेलर यांनी माझा मुलगा जेलमध्ये गेल्यानंतर समजल्याने जेलर यांनी माझ्या मुलास जातीवाचक शिवीगाळ व बेदम मारहाण केली व म्हणाले की, माझी तक्रार करतो काय ? तुम्ही मांग जातीचे लोक खुप माजले आहेत. सरकारने तुम्हांला डोक्यावर घेतले आहे. थांब आता तुझा बेतच पाहतो. मी नाशिक जेलवरून बदली होऊन आलेलो आहे. नाशिक सेंट्रल जेलमधील कैद्यांना मी सरळ केलेले आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. माझ्या मुलाचे जिवीतास काही धोका झाल्यास त्यास हे जेलर पाटीलच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
तरी मुख्य जेलर पाटील यांनी माझा मुलगा राजु साहेबराव काते यास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली आहे त्यामुळे त्यांचेविरुध्द अॅट्रासिटी कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती. सबजेलचे जेलर पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांची बदली करण्यात यावी किंवा त्यांना निलंबित करण्यात यावे.अशी मागणी त्यांनी केली आहे.