दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या अंगात अचानक देव येतो आणि त्यानंतर पहा काय घडतं…
आपण एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात आणि एवढ्या मोठ्या रांगा लागलेल्या असताना आपण दर्शन घेण्यासाठी नक्कीच काहीतरी शक्कल लढवत असतो पण ती काम करेलच असं नाही पण सदरचे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एवढी मोठी रांग लागलेली असताना देखील या महिलेने असं काही केलं की तिचा सगळ्यात आधी नंबर लागला कसा तो आपण पाहू,
मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर लांबच लांब लांब रांग असते आणि आपल्याला दर्शनासाठी खूप वेळ ताटकळत उभा रहावं लागतं पण ही करत असताना रांगेमध्ये न थांबता दर्शन कसे घ्यायचे हे या महिलेकडून शिकण्यासारखे आहे. या महिलेने या व्हिडिओमध्ये जे काही केले ते सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि त्याच प्रकारे प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.
ती महिला दर्शनाला आल्यानंतर मोठी रांग बघून ती महिला केस मोकळे ठेवते व त्या महिलेच्या अंगात आले आहे असं ती भासवते आणि त्याचप्रमाणे ती रांगेमध्ये वाट पाहणारे भाविकांना मागे टाकून पुढे जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती पुढे जात असताना तिला कोणीही अडवत नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीने महिलेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे त्यानंतर लोकं लिहीत आहेत की मंदिरातील रांग जर टाळायची असेल तर हा एक प्रकारे चांगला मार्ग आहे.
या महिलेने जो मार्ग निवडला आहे तो प्रत्येक वेळेस योग्यच घडेल असं नाही काही वेळेस असा मार्ग अंगाशी देखील येऊ शकतो हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जवळजवळ दोन लाख होऊन अधिक लोकांनी पाहिला आहे हा व्हिडिओ पोस्ट करत असताना त्या ठिकाणी लिहिले आहे की मंदिरांमधील रंग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी खूप छान छान प्रतिक्रिया दिल्या आहेत यामध्ये काही म्हणतात की महिलेच्या खरंच देव अंगात आला आहे तर काहीजण म्हणतात की गर्दी टाळण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी वापरलेला सोपा मार्ग आहे आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.