ताज मध्ये जाऊन त्याने जेवण केलं पण बिल देण्याची वेळेस त्याने जे केलं, कोणाचा विश्वास बसणार नाही.
काही मुलांना दररोज काही ना काही कांड करायची सवय लागलेली असते आणि अशीच एक घटना या तरुणाकडून घडली आहे हा तरुण ताज हॉटेलमध्ये पोटभर जेवला आणि ज्यावेळेस बिल द्यायची वेळ येते त्यावेळेस या तरुणाने जे काही केले ते पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही.
सदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की, सिद्धेश असे नावाचा मुलगा निळ्या रंगाचा सूट घालून हॉटेलमध्ये प्रवेश करतो त्यानंतर मेनू पाहून फूड ऑर्डर करतो आणि मॉकटेल ऑर्डर करतो. सहसा आपण 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल कसे भरतो तर त्याचे उत्तर आहे एक तर रोख पैसे देऊन किंवा पैसे नसल्यास कार्डद्वारे आपण पेमेंट करू शकतो.
मात्र या व्हिडिओमध्ये त्या तरुणाने काहीतरी वेगळच केला आहे या तरुणाचे नाव सिद्धेश लोकरे असे आहे हा अलीकडे एका हाय एंड रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी जातो या ठिकाणचे बिल भरण्यासाठी त्याने नोटांचा वापर न करता चक्क नाण्यांचा वापर केलाय आणि त्याचा अनुभव त्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे तो म्हणतो की, “ताज हॉटेल मे भी कांड कर आये !” व्यवहार महत्त्वाचा असतात मग तो डॉलरचा असो किंवा रुपयांचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा तरुण जेवण उरकल्यानंतर एक पिशवी काढतो आणि त्या पिशवीतून नाणी काढून मोजायला सुरुवात करतो त्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा हॉटेलचे कर्मचारी येतात त्यावेळेस हा तरून ते पैसे त्यांच्या हातामध्ये देतो.
काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता तो पोस्ट केल्यानंतर एक लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तसेच यावेळी व्हिडिओ वर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील येत आहे