Video Viral: पैलवान नवरदेवाच्या मित्रांनी केली अशी डिमांड; नवरदेवाने भर लग्नात पहा काय केले काम.
प्रत्येकाचे आयुष्यामध्ये लग्न हा क्षण खूप महत्त्वाचा असतो. लग्न म्हटल की मित्र मंडळी, कुटुंब, भाऊ-बहीण हे सर्वजण चारचांद लावत असतात. त्यामुळे त्या लग्नाला आणखीनच शोभा येते आणि हे सर्वजण लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोजमाज्या देखील करत असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नातील क्षण हा खूप खास असतो. मित्रमंडळी कुटुंब व इतर सर्वजण लग्नाला चारचांद लावत असतात. त्यामुळे लग्नातील मौजमजा आणखीनच वाढत असते. पण कधी कधी लग्नामध्ये असंही घडतं की, मित्रांची डिमांड पूर्ण करावी लागते आणि मित्रांची डिमांड पूर्ण करण्याच्या नादात नवरा किंवा नवरीची चांगलीच फजिती होताना आपण अनेक वेळा पाहिली आहे आणि अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे आणि सध्या तो मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे.
या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की, एक पहिलवान मुलाचे लग्न आहे आणि त्या पैलवानाच्या लग्नात मित्र काही इच्छा मांडतात अशा वेळेस पहिलवानाने कशाची तमा न बाळगता लग्नामध्ये घातलेल्या पोशाखांमध्येच जोर बैठका काढल्या आहेत. यामध्ये या नवरदेवाचे मित्र नवरदेवाला उठाबशा, जोर बैठका काढायला सांगत आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे सदरील व्हिडिओ कोल्हापूर मधील कागल तालुक्यातील बानगे गावातील असून पहिलवान नवरदेवाचे नाव अभिजित सावंत असे आहे. शुक्रवारी त्याचे लग्न पार पडले आहे आणि हा सर्व प्रकार लग्नात घडला आहे सध्या हा प्रकार लग्नातला चर्चेचा विषय बनला आहे.
आपण पाहतो की, लग्नातील अनेक मजेशीर विचित्र हटके व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल होत असतात आणि लग्न म्हटले तर खूप मोजमाजा असते यावेळेस लोक एकत्र जमत असतात आणि अनेक वेळा भर लोकांच्या गर्दीमध्ये नवरी किंवा नवरदेवाच्या बऱ्याच प्रकारे मजेशीर घटना घडत असतात आणि अगदी काही क्षणांमध्ये हे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.