महिलांसोबत विनयभंग करणारा लोमटे महाराज अखेर अटक; महिला भक्तांसोबत करायचा नको तसे चाळे पहा सविस्तर.
एक धक्कादायक बातमी समोर येते, अध्यात्माच्या नावाखाली एका भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांचे महिलांसोबत जे काही सुरू होतं ते अखेर जगजाहीर झालं, उस्मानाबाद जिल्ह्यातून ही बातमी समोर आली. स्वयंघोषित एकनाथ लोमटे या महाराजास पोलीस कोठडी सुनावाली आहे. कळंब प्रथम वर्ग न्यायालयाने लोमटे महाराजाला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीआहे. या महाराजाने भक्त महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसानी अटक केली आहे, विशेष म्हणजे हा महाराज 45 दिवस फरार होता,
हा महाराज महिलांकडे शरीर सुखाची मागणी करत असे, अन्यथा तुमचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत तो विनयभंग करत असे. अशा पद्धतीने आणखी किती महिलांचा विनयभंग केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत, हीच चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली आहे.
दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे या महाराजांच्या विरोधात महिला भक्तांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर विनयभंगाच्या अनेक घटना यामध्ये उघड झाल्या आहेत. अखेर 45 दिवसानंतर कळंब पोलिसांनी फरार असणाऱ्या महाराजाला अटक केली. नंतर या महाराजाची कसून चौकशी सुरू आहे, आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्तांना बरं करतो अशी महाराजांची ख्याती आहे, मात्र हाच महाराज भक्त महिलांसोबत अत्यंत चुकीच वागतो हे देखील आता समोर आल आहे. राज्यभर मोठा भक्त वर्ग आहे. विविध पक्षांचे बडे नेते या महाराजांचे भक्त आहेत.
विनयभंग प्रकरणात लोमटे महाराजाला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. माझ ऐका ,बाहेर काही सांगू नका अस म्हणत तो धमक्या द्यायचा. गुंगीच औषध देऊन तुझ्या वर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ शूटिंग व्हायरल करेन अश्या धमक्या देत असे, मात्र पोलिसांनी उशीरका होईना पण अध्यात्माला काळिमा फासणाऱ्या महाराजाला अटक केली.