व्हायरल : पार्टी करत असताना पहा कोण आला हा अनोखा पाहुणा; पाहा व्हिडिओ सविस्तर.
विविध कारणास्तव पार्ट्या अनेक जण करतात. पार्टी ही प्रत्येकाला आवडणारा क्षण असतो. यामध्ये खाणे, अभिनय, आणि मौज मजा करण्यात आपण मनमुरात पणे आनंद लुटतो. मात्र जर आपल्या पार्टीला जर सिंह आला तर ? तर तुम्ही म्हणाल अशी कशी अजब बातमी आहे ? हो एका ठिकाणी पार्टीला खरा खुरा सिंह आला आहे आणि त्यामुळे पार्टीमध्ये थ्रिलर आणि मस्ती वाढली होती. ही पार्टी नेमकी कुठे झाली ? ते पाहू.
हल्लीच्या काळात थीम पार्टीचं प्रमाण हे प्रचंड वाढलं आहे. पार्टीमध्ये थ्रिल, मस्ती वाढावी यासाठी लोक जंगलात, पाण्यात किंवा डोंगरावर जाऊन पार्ट्या करतात. पण या पार्टीत अचानक एखाद्या जंगली प्राण्यानं एण्ट्री मारली तर ? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पार्टीत चक्क जंगलाचा राजा सिंहानं अचानक एण्ट्री मारली. आणि मग सिंहाला पाहून लोकांची एकच पळापळ झाली. काही जण तर नारळाच्या झाडांवर चढू लागले. हा खतरनाक व्हिडीओ पाहून कोणालाही घाम फुटेल.
https://www.instagram.com/lions.habitat/?utm_source=ig_embed&ig_rid=ee09b3bc-5bb4-4ac9-a4e9-13864a538af1
त्या पार्टी मध्ये सिंह आला कारण कि त्या पार्टीमधील लोक त्या सिंहाच्या परिसरात जाऊन पार्टी करत होते, आणि जर कोणी आपल्या परिसरात येऊन घुसखोरी करत असेल तर हे अस होणे साहजिकच आहे. अश्या वेळेस खऱ्या अर्थाने ते देखील पार्टीला येऊ शकतात आणि असंच घडलं आहे. एका पार्टीत जंगलाचा राजा सिंह याने थेट एन्ट्री मारली आणि त्यानंतर पार्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची धांदल उडाली जो तो आपले प्राण वाचवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी पळू लागला.
अनेकांना तर घाम देखील फुटला काही लोकांनी नारळाच्या झाडाचा आधार घेतला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय शंभर कोटीहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. दहा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे मात्र दहा सेकंदात या पार्टीत काय घडलं याचा प्रत्यय यामध्ये दिसतोय. हा सिंह आक्रमक आला होता मात्र यांनी शिकारी केली आहे की नाही याची कुठलाही वार्तां नाहीये मात्र व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हे मात्र खरे.