काका, मामा माझा हात सोडू नका, नाहीतर मी मरून जाईल; चोराची रेल्वे प्रवाश्याकडे विनवणी पहा सविस्तर.
मला धरून ठेवा अशा आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. चोराचा हा व्हिडिओ असल्याचा समजते. बिहार मधला हा व्हिडिओ आहे असे देखील समजते. व्हिडिओमध्ये मोबाईल चोर ट्रेनच्या खिडकीला बाहेरून लटकलेला आहे. दोन चोर प्रवाशांचा मोबाईल चोरून पळ काढत होते. त्यातील एक चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर दुसऱ्या चोरट्याला रेल्वेत बसलेल्या प्रवाशांनी पकडलं.
अश्यातच ट्रेन सुरू झाली. आणि चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला प्रवाशांनी खिडकीबाहेर लटकवून ठेवलं. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता कि, तो चोर स्थानिक भाषेत प्रवाशांकडे विनवणी करताना दिसत आहे. माझा हात सोडू नका, हात मोडेल. हात नका सोडू, नाहीतर मी मरून जाईन, अशा शब्दांत चोर प्रवाशांकडे याचना करत होता. आणि यातच ट्रेन भरधाव वेगाने जात होती त्यामुळे त्याला त्याचे मरण दिसले होते.
हा चोर मोबाईल चोरी करण्यासाठी आला होता. येताना दोघेजण आले होते, त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दुसऱ्याला रेल्वेत बसलेल्या प्रवाशांनी पकडून ठेवला. तितक्यात ट्रेन सुरू झाली चालत्या ट्रेन मधून मोबाईल चोरणाचा प्रयत्न करणाऱ्या छोट्याला प्रवाशांनी बाहेर लटकून ठेवले. ट्रेन भरधाव वेगाने जात असतानाच चोर बाहेर लटकत होता. आणि अशातच तो आत मध्ये असणाऱ्या प्रवाशांकडे, हात सोडू नका, हात मोडेल. हात सोडू नका नाहीतर मी मरून जाईल. अशा शब्दात हा चोर प्रवाशांकडे वाचवण्याची याचना करत होता.
या चोराने चोरीचा प्रयत्न केला पण यावेळी तो मात्र फसला, चोरीसाठी युवकानी प्रयत्न केला पण आजचा त्याचा दिवस नसल्याने त्याला थेट पोलीस स्टेशन मध्ये जाव लागल. त्याने आज केलेल्या या प्रयत्नामुळे त्याचा जीव देखील जाऊ शकत होता याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. या चोराचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय आणि हा व्हिडिओ अनेकजण पाहून चोराबद्दल अनेक प्रतिक्रिया देत आहेत.