स्वस्त धान्य दुकानवर कारवाईसाठी छावा मराठा सेना संघटनेची मागणी मागणी.
प्रतिनिधी:- येवला नाशिक,
दि.२८/०७/२०२३ रोजी छावा मराठा सेना संस्थापक अध्यक्ष मा सुनिल भाऊ भोर व संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट भाऊ पा पताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे रेंडाळे तालूका येवला तालुका येथील पार्वती महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११९ ची चौकशी होऊन दोषी आढळून देखील कार्यवाही होत नसल्याबाबत मा उप जिल्हाधिकारी श्री राजेन्द्र वाघ व मा मुख्यमंत्री सचिवालय नाशिक यांना निवेदन देण्यात आले
येवला तालुक्यातील मौजे रेंडाळे येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११९ दोषी आढळून आले आहे. या संदर्भात कार्यवाहीसाठी अणेकवेळा जिल्हा पुरवठा विभागाकडे पत्र व्यवहार करुन देखील कुठली कार्यवाही होत नाही.सदर योजनेपासून कुठलेही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी आपण दोषी आढळलेल्या
पार्वती महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११९ योग्य ती कारवाई करून ७ दिवसांच्या आत व १०/०८/२०२३ पर्यंत योग्य तो न्याय मिळवून द्यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर कुठल्याही क्षणी छावा मराठा सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.
पुढील परिणामास आपण स्वतःता जबाबदार रहाल असा इशारा संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट भाऊ पा पताडे यांनी दिला आहे.
निवेदन देण्यासाठी संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट भाऊ पा पताडे,येवला तालुका अध्यक्ष श्री नवनाथ आहेर, येवला तालुका संपर्क प्रमुख श्री आण्णासाहेब सोमासे, संघटनेचे सदस्य श्री संजय चिखले इ.पदाधिकारी उपस्थित होते.