‘नाच रे मोरा’ गाण्यावर केला सरकारी अधिकाऱ्यांनी डान्स, भन्नाट पिकॉक डान्स होतोय व्हायरल..
सोशल मीडिया वरती एक डान्स चांगलाच धुमाकूळ घालतोय, हा डान्स कुणी आयऱ्यागऱ्यांनी केला नाही तर हा डान्स चक्क अधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्यामुळे या डान्सला विशेष पसंती दिली जाते. अगदी लहानपणापासून तुम्ही नाचरे मोरा हे गाणं ऐकत असाल आणि हेच गाणं या अधिकाऱ्यांनी नृत्य मध्ये सादर केल आहे. त्यांच्या नाच रे मोरा या गाण्याच्या स्टेप्स पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. कारण पाहणाऱ्याला प्रत्येकाला आपलं बालपण आठवत आहे. शरीराने मोठे असणारे अधिकारी अगदी लहान मुलांसाठी नाचत असताना पाहून अनेकांना सुखद धक्का बसतो.
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती फॉरवर्ड केला जाट आहे. आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही देखील बऱ्याचदा पाहिला असेल, अनेकानी हा व्हिडिओ स्टेटसला देखील ठेवलाअसून अधिकारी वर्गाने केलेला हा डान्स अनेकांना भावला आहे, हा डान्स का बर केला हे देखील आपण पाहूयात…
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील जलसंपदा विभागानं नव्या वर्षाच्या निमित्तानं एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या सांस्कृतिक सोहळ्यात जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांनी चक्क नाच रे मोरा आंब्याच्या वनात या लोकप्रिय बालगीतावर धम्माल डान्स केला. हा विशेष डान्स करण्यासाठी त्यांनी शाळेतल्या मुलांसारखा पांढरा शर्ट, खाकी हाफ पँट आणि डोक्यावर गांधी टोपी असा गणवेश देखील घातला होता. हा डान्स पाहून बालपणीच्या आठवणी ताज्या होतील.
लहान असताना आपल्यापैकी अनेक जणांनी नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यावर डान्स केला असेल. हे गाणं ऐकताच बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. लहान असताना शाळेत केलेल्या गंमतीजंमती नकळतपणे डोळ्यांसमोर तरळू लागतात. याच पार्श्वभूमीवर एक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुण्यातील जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी चक्क नाच रे मोरा या गाण्यावर भन्नाट डान्स केला. लक्षवेधी बाब म्हणजे हा डान्स करण्यासाठी त्यांनी चक्क शाळेतल्या मुलांसारखा गणवेश देखील घातला होता. या डान्समध्ये ज्या स्टेप्स मारल्या आहेत. त्या पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
सोशल मिडिया वरती असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, तुम्हालाही ते व्हिडिओ अनेकदा आवडतही असतात मात्र शहानिशा केल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करू नका जेणेकरून चुकीच्या गोष्टी पसरण्यास अटकाव बसेल ,बाकी हा विडीयो आवडला तर पुढे पाठवा.