प्राणघातक हल्ला झालेल्या गणेश दशरत विणकर व विणकर कुटुंबांला धीर व आधार.
बोल्डा ता कळमनुरी जि. हिंगोली येथील सरपंच पदाच्या निवडणुका झाल्या सरपंचपदी चर्मकार समाजाचे किसन वामनराव विनकर हे निवडून आले. तसेच यांचे पॅनल ही निवडून आल्याने विरोधी गटातील जातीयवादी लोकांनी आकस ठेऊन बदला घेण्याच्या वाईट हेतुने दि.६ जानेवारी रोजी गणेश दशरथ विणकर यांला लोखंङे सळीने,लाट्या,काठ्या व कुऱ्हाडीने जबर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असुन इतर कलमा सोबत ॲट्रॉसिटी चे कलम लावण्यात आले.नऊ आरोपी पैकी तीन आरोपी अद्यापही अटक झालेले नाही.
दि.१९ जानेवारी रोजी मा.संजय खामकर प्रदेशाध्यक्ष चर्मकार विकास संघ मा. लक्ष्मणराव घुमरे संस्थापक अध्यक्ष गुरु रविदास चर्मकार महासंघ तथा माजी प्रदेशाध्यक्ष चर्मकार ऐक्य परिषद मा.वसंतराव धाडवे प्रदेशाध्यक्ष गुरु रविदास विश्व महापीठ यांनी बोल्डा येथे पिङीत विणकर कुटुंबांची घरी जाऊन त्यांची भेट घेतली हे प्रकरण हतळणारे श्री.कांबळे साहेब डी वाय एस पी यांच्यासोबत चर्चा करून फरार तीन आरोपींना त्वरित अटक करावी व याप्रकरणी पोलीस खात्याकडून कडक कारवाई करावी अश्या प्रकरची चर्चा केली. त्यांनीही या प्रकरणातील फरार आरोपी अटक करणार असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिली.
यावेळी बोल्डा येतील सर्वश्री किसन वामनराव विनकर, सरपंच .तुकाराम महादाजी विनकर, महादजी वामनराव विणकर, गजानन काशीराम विणकर, दत्तराव महादजी विणकर, रामेश्वर सिताराम विणकर, व विठ्ठल सखाराम दिनकर इत्यादी हजर होते.