देवीची ज्योत घेऊन जाणाऱ्या भक्तावर काळाचाच घाला, त्यांच्यासोबत घडलं अस काही कि, सगळ गाव हळहळलं..
नवरात्री उत्सव सुरू व्हायला आता एकच दिवस बाकी आहे. मात्र या नवरात्र उत्सवाला गालबोट लागलंय. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन गावी निघालेल्या दुचाकी वरील दोघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन तरुणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या ठिकाणी ही घटना घडली आहे.
महेश भोसले, अमोल खिलारे असं अपघात झालेल्या मृतांची नाव आहेत. दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची परंपरा आहे. यासाठी गावातील 50 भाविक तुळजापूर या ठिकाणी गेले होते. यातील एका दिवसातील येरमाळा जवळ अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे या दोघांचा जाग्यावर मृत्यू झाला. महेश भोसले हे आरोग्य सेवक होते तर अमोल खिलारे हे उपसरपंच होते.
दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे. नवरात्री उत्सव सुरू होताना अनेक गावांमध्ये आदिशक्ती तुळजाभवानी इथून ज्योत आणण्याची परंपरा असते. आणि यासाठी तरुणांची लगबग सुरू असते. आपणच आपल्या गावात पहिली ज्योत घेऊन येण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. आणि याच पद्धतीने ज्योत आणण्यासाठी गेलेले दोघेजण यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आणि यात हे देवीचे भक्त मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला गालबोट लागलं आहे.
दरम्यान, या नवरात्र उत्सवामध्ये खिलारे आणि भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि या दोघांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन या सणासुदीमध्ये असे काही घडले आहे.