वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांनी सेवानिवृत्तीच्या पर्वावर असूनही पी.एच.डी.साठी केले नामांकन.

स्त्रिया ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही येत त्या सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत आणि स्त्रियांना प्रगतीपथावरती आणणाऱ्या महत्त्वाचा जो घटक असेल ते म्हणजे शिक्षण ! शिक्षण कधीही आणि कुठलाही अटी शर्ती वरती थांबलं नाही पाहिजे एक स्त्री शिकली तर दोन कुटुंब शिक्षित होतात. शिक्षणाचे महत्त्व हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळेच तर…
सेवानिवृत्तीच्या पर्वावर असूनही वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे एम.एड परिक्षेत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊनही ज्ञानाची भूक अजूनही अतृप्त पी.एच.डी.साठी केले नामांकन
खामगांव: पंचायत समिती खामगांव येथील शिक्षण विस्तार अधिकारी वनश्री ऊर्मिलाताई श्रीकृष्णराव ठाकरे ह्या नुकत्याच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून एम, ए (शिक्षणशास्त्र ) समकक्ष एम.एड या परिक्षेत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून ८६% गुण मिळाले आहे,य.च.मु.विद्यापीठ नाशिक यांनी नुकताच त्यांचा निकाल जाहीर केला आहे.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेशानुसार शिका, संघटित व्हा, संघर्ष करा “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो ते घेईल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.मनुष्य हा जन्मभर विद्यार्थी असतो,मरे पर्यंत शिकत राहावे या उक्तीप्रमाणे वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांनी सेवानिवृत्तीच्या पर्वावर असतांना सुध्दा शिक्षण विस्तार अधिकारी या पदाची चोख जबाबदारी सांभाळत असतांना सुध्दा एम. एड करिता प्रवेश घेतला.चुल-मुलं, नोकरी,
भाकरी सांभाळून अभ्यास केला व त्या प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एम.एड.करून एवढ्या शिक्षणावर त्या न थांबता त्यांनी पी,एच डी साठी सुद्धा नामांकन दाखल केले आहे.मूल्यशिक्षण या विषयावर त्या पी.एच.डी करणार आहेत.अजून ही ऊर्मिलाताई ठाकरे यांची ज्ञानाची भूक अतृप्त आहे.खरंच अशी जिद्द आणि चिकाटी असावी.