सहा वर्षाची चिमुकली मध्यरात्री उठली; पण नंतर जे झाले त्याने गावावर शोककळा पसरली पहा बातमी सविस्तर.
सहा वर्षाची चिमुकली आपल्या आई सोबत जमिनीवर झोपलेली होती पण मध्यरात्री तिच्यासोबत असं काही घडलं की, संपूर्ण गावावर शुभकाळा पसरली आहे. तसेच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
ही चिमुकली आपल्या आईसोबत घरातल्या जमिनीवर नेहमीप्रमाणे झोपली होती, मध्यरात्रीच्या सुमारास तिला आपल्याला काहीतरी चावलं आहे असं भास झाला. या लक्ष्मीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईला सांगतात आईने पाहिले असता उजव्या पायाच्या बोटाजवळ काहीतरी चावल्याचं दिसून आलं. आणि तोपर्यंत त्या लक्ष्मी चे वडील जितेंद्र हे जागे झाले होते आणि काही क्षणांमध्येच या लक्ष्मीचा पाय काळा पडायला लागला.
आपल्या चिमुकल्या लक्ष्मीला सापाने दंश केला आहे अशी खात्री होताच या चिमुकलीला घेऊन तात्काळ कोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणली. मात्र काही वेळामध्ये या लक्ष्मीचा मृत्यू झाला. सकाळी जेव्हा या घटनेची माहिती गावात झाली, त्यावेळेस अनेकांनी जितेंद्र सुखदेवे यांच्या घरी धाव घेतली. या छोट्याशा चिमुकलीच्या जाण्याने प्रत्येक जण हळहळ करत होता. या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या सहा वर्षाच्या चिमुकलीवर काळाने घाला केला आहे आपल्या आई सोबत झोपलेली असतानाच सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. सदरील घटना ही भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पिंपळगाव येथे मध्यरात्री घडली आहे. लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे वय 6 वर्ष रा. पिंपळगाव (निपाणी) असे मृत बालिकेचे नाव आहे.