रत्नदिप फाऊंडेशनचा ” वासनेने हाफफलेला ” संस्थापक लवकरच होणार गजाआड..
अन्यायाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, सलग तीन दिवसापासून विद्यार्थी आपल्या न्याय – हक्कासाठी आंदोलन करत होते. आणि अखेर उशिरा रात्री विद्यार्थ्यांच्या थोडे का होईना यश पदरात पडले.
जामखेड मधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे हा वाजवी शुल्क आकारतो, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करतो तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे शिक्षण या संस्थेमध्ये दिले जात होते आणि इथल्या विद्यार्थिनीसोबत संस्थाचालक लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत होता, क्लासरूम मध्ये येऊन विद्यार्थिनींना टॉर्चर केलं जातं, त्यांना खालच्या थरला जाऊन भर वर्गात बोलायचा, “तू लांब सारक तू अंघोळ नाही केली तुझा घाण वास येत आहे ” असे शब्द प्रयोग करायचा. विद्यार्थ्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये हस्तक्षेप करणं, त्यांचे मोबाईल तपासणं त्याच्याकडून कोऱ्या स्टॅम्पवर सह्या करून घेणे त्यांच्या पर्सनल चॅटिंग पाहणं, त्या व्हायरल करण्याच्या धमक्या देणं, विद्यार्थिनींचे नकळत फोटो काढून घेणे, महाविद्यालयाची बस आणि महाविद्यालयाच्या कॅन्टीनचा वापर करण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करणं अशा अनेक गोष्टी लादल्या जात होत्या.
सगळ्याच्या विरोधात विद्यार्थिनी आणि विद्यार्थी रस्त्यावरती उतरत त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती, त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, मनसे, वकील संघटना यांचं सहकार्य लाभलं, सलग तीन दिवस आंदोलन सुरू होतं अखेर तिसऱ्या दिवशी उशिरा मध्यरात्री या कॉलेजच्या विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून डॉ भास्कर मोरे याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत, आपण जर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तर आपलं शैक्षणिक नुकसान होईल आपल्याला संस्थापक त्रास देईल, या भीतीने या विद्यार्थिनी गेल्या कित्येक वर्षांपासून या संस्थेचा अन्याय सहन करत होत्या, अखेर या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हिम्मत करत या संस्थाचालकावरती गुन्हा दाखल केला, अगदी सहा महिन्यापूर्वी डॉ भास्कर मोरे यांच्या वरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, काही अटी शर्ती अनुषंगाने त्याला जामीनही मिळाला होता.
मात्र पुन्हा ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशीच या संस्थाचालक भास्कर मोरे याच्या पापाचा घडा भरला व पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा क्र 104/2024IPC 354,354 (अ) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अजूनही विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरूच आहे जोपर्यंत संस्थाचालक डॉ. भास्कर मोरेला अटक होत नाही, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील कुलगुरू जोपर्यंत घटनास्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन / उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे