लाखोंची नोकरी सोडून बनला घरतला चाकर, पतीच्या साथीने न्यायाधीश होऊन गाठले तिने यशाचे शिखर.
असं पहिल्या काही बोललं जायचं कि, नवरा घराबाहेर काम करेल आणि बायको घरातील चूल सांभाळेल, पण आता ही म्हण बदलली आहे. पती-पत्नी आता खांद्याला खांदा लावून सर्व जबाबदारी पार पाडत आहेत, उलट ते एकमेकांना प्रोत्साहनही देताना आपण पाहतो, हे बदलत्या समाजासाठी आनंदाचे लक्षण आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये असेच एक जोडपं आहे, त्यांनी समाजाला नवी दिशा दिली आहे.
दोघांनी एकत्र काम केले तर काहीही अशक्य नाही. अशा हजारो किस्से सापडतील, जिथे प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो असे ऐकायला मिळते. मात्र हरियाणातील या दाम्पत्याची गोष्टच निराळी आहे. या महिलेच्या यशामागे एका पुरुषाचे योगदान आहे आणि तो पुरुष दुसरा कोणी नसून तिचा पतीच आहे. नुकताच उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवेचा निकाल लागला. या परिक्षेत रोहतकच्या मंजुला भलोथिया हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रत्येक परिक्षेत कुणी ना कुणी टॉप करतो, त्यामुळे ही बाब सामान्य वाटू शकते. पण, मंजूळाची कहाणी हि थोडी वेगळी आहे. मंजुळा आणि तिचे पती सुमित अहलावत रोहतक येथे राहतात. सुमित एका कंपनीत लाखो रुपये पॅकेज असलेली नोकरी करत होता. तर मंजुळा हिला न्यायाधीश बनायचे होते आणि हे तिचे स्वप्नही होते. मात्र, पण मुलांची, घराची जबाबदारी असल्याने तिच्यासमोर हे मोठे आव्हान होते. कारण मुलांना सांभाळण्यासोबतच अभ्यास करणंही अवघड काम होतं. अशा परिस्थितीत मंजुळाच्या अभ्यासासाठी सुमितने नोकरी सोडली आणि स्वतः घर सांभाळायला सुरुवात केली.
घरखर्च चालवण्यासाठी मंजुळा अभ्यासासोबतच नोकरी करायची. मात्र, मंजुळाच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही. सुमित हा पूर्णपणे घरी मुलांची काळजी घ्यायचा, त्यांच्या शाळेचा टिफीन आणि घरातील स्वयंपाक घराची जबाबदारी पार पाडू लागला. सुमितने नोकरी सोडली तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला खूप समजावून सांगितले की, हे पाऊल योग्य नाही आणि तू बाईसारखा चूल पेटवायला लागलास, हे तुझ्या भविष्यासाठी चांगले होणार नाही, तू तुझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेस.
मात्र, त्याने कुणाचेच ऐकले नाही आणि आनंदाने घरातील सर्व जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. तर दुसरीकडे मंजुळाने तीन वेळा न्यायाधीशाची परिक्षा दिली होती. मात्र, ती पास झाली नाही. मंजुळा निराश होत होती, तेव्हा सुमित तिचा आत्मविश्वास वाढवत होता आणि पुढच्या वेळी छान होईल, असे सांगत असायचा. 12 सप्टेंबरला जेव्हा उत्तर प्रदेश न्यायिक सेवा परिक्षेचा निकाल लागला तेव्हा सुमितनेच तिचा निकाल पाहिला आणि जेव्हा तो मंजुळाच्या समोर गेला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रु आले. मंजुळाला वाटले की यावेळीही तिची निवड झाली नाही. मात्र, थोडा वेळ गप्प राहिल्यावर दोघेही आनंदाने किंचाळले.
सुमितने तिला ती अव्वल आल्याचे सांगितल्यावर मंजुळा आणि सुमितने सांगितले की, कशाप्रकारे त्यांनी एक दुसऱ्याला विश्वास देऊन हे यश मिळवले आहे. सुमितने ज्याप्रकारे हाऊस हसबंड बनून संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली ते कौतुकास्पद आहे. अशी कथा हरियाणाच्या ग्रामीण समाजात मिळणे फार कठीण आहे. मात्र, मंजुळाच्या यशाने महिला आणि पुरुष समान आहेत, असा विचार करायला लोकांना भाग पाडले आहे. कोणीही कमी नाही म्हणून एकमेकांना साथ दिली पाहिजे.