तीन दिवसापासून बेपत्ता होती, सापडली तेव्हा तिला पाहून पोलीसही हैराण ! पहा सविस्तर बातमी.
जळगाव जिल्ह्यात धरणगाव शहरापासून जवळ असणाऱ्या चिंचपूरा गावाच्या अलीकडेच शेतातील विहिरीत एक धक्कादायक प्रकार आढळून आला. मागील तीन ते चार दिवसापासून जी महिला बेपत्ता होती त्याच महिलेचा मृतदेह या विहिरीमध्ये आढळून आला.
धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडे शेतातील विहीरी मध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक लोकांनी पाहिलं असता त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला पावरा समाजातील असून तिचा पती आणि ती पिंपरी या ठिकाणी वास्तव्य करत होते. काही लोकांना महिलेस मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या ठिकाणी माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. महिलेचा मृतदेह विहिरी मधून बाहेर काढण्यात आला. मृत महिलेचा देह नातेवाईक बुरहानगर येथे घेऊन जाणार असल्याचे कळत आहे.
दरम्यान महिलेचा घातपात घडवून हा मृतदेह विहिरीत फेकून दिला का? की कुठल्या कारणास्तव या महिलेने आत्महत्या केली? हे अजून स्पष्ट नाही. नातेवाईक आल्यानंतर याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे . मात्र प्राथमिक माहिती मध्ये ही महिला गेल्या तीन ते चार दिवसापासून बेपत्ता होती अशी माहिती पुढे आली आहे. या महिलेचा मृतदेह अगदी कुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा जुना मृतदेह असावा असाही अंदाज बांधण्यात येत आहे. विहिरीत या महिलेचा मृतदेह पाहून या ठिकाणी सर्वांना एकच धक्का बसला. या घटनेमुळे या परिसरामध्ये खळबळ माजली.