व्हायरल व्हिडिओ : वाहतूक पोलिसावर धावून जाने पडले महाग; पहा नंतर त्याची काय केली अवस्था.
वाहतूक पोलीस प्रशासन कडून काही नियम घालण्यात आले आहेत. ते सगळ्यांनी पाळायचे असतात. यातच आपण प्रवास करत असताना जर सिग्नल लागले तर सर्वजण गाडी थांबवतात आणि ती थांबवली पाहिजे कारण हा नियम आहे. पण बऱ्याचदा आपण पाहतो की, वाहतुकी बाबतचे नियम बरेच जण पायदळी तुडवतात. मग ते दुचाकी अथवा मोठमोठ्या गाड्या बरेच जण लागलेला सिग्नल न पाहता तसेच पुढे निघून येतात. पण हा एक गुन्हा आहे असं काही करत असताना जर आपण वाहतूक पोलिसांच्या ताब्यात सापडलात तर मात्र आपले काही खरं नाही, असंच काहीसं या सदरच्या व्हिडिओमध्ये घडलेला आहे.
दुचाकीस्वार सिग्नल लागलेला असतानाही गाडी थांबवत नाही, अशा वेळेस वाहतूक पोलीस याला चांगली अद्दल घडवतात. हा दुचाकी स्वार सिग्नल लागलेला असून देखील तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस त्याला वाहतूक पोलीस आडवतात आणि त्यानंतर चालू होतो तो खरा राडा….
सध्या गणपती उत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे गणपतीचे आगमन आणि त्यासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे त्यामुळे पोलिसांवर चांगलाच भार पडला आहे. सिग्नल पार करत असताना पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी ” तुम्ही ट्रॅफिक काढत नाहीत, तुम्हाला समजतं का ?” यावरून पोलिसांनी त्याच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गेला. त्यामुळे संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला ढकलून खाली पाडले.एक तर वाहतुकीचे नियम मोडले आणि वरून पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या या दुचाकी स्वराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुचाकी स्वार व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी दिले आणि त्याच्यावर कारवाई केली.
हा सर्व प्रकार पनवेल मधील रोडपाली सिग्नलवर घडला. सदरची संपूर्ण घटना मागे उभा असलेल्या कारचालकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. आणि सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून जाणाऱ्याला पोलिसांनी चांगला इंगा दाखवला आहे.