धक्कादायक : एका पोलिसाच्या मुलानेच उचलले टोकाचे पाऊल ; पहा बातमी सविस्तर.
घातपाताच्या आत्महत्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत यातच आता ही बातमी यवतमाळ जिल्ह्यातून येते यवतमाळ जिल्ह्यात खळबळ माजणारी ही घटना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा मृतदेह हा पुलाजवळ आढळून आला बेभान वाहणाऱ्या नदीच्या अगदी कडे लोखंडी अँगल ला टायरच्या पट्टीमध्ये अडकवलेला हा मृतदेह आढळून आला.
एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा पाटाळा पुलाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे आणि यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरील मुलाचे नाव तेजस विजय मोगरे( वय २० रा. वणी ) असे मृतकाचे नाव आहे. हा मुकुटबन पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विजय मोगरे यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
आज दि. ३१ ऑगस्ट ला सकाळी वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरील कठड्याच्या पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेजस चा मृतदेह आढळून आल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. हि घटना माजरी पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने माजरी पोलिस घटनेचा तपास करत आहे.
हा मृतदेह पाहता क्षणी ही आत्महत्या दर्शत नाही यामागे नेमकं काय कारण असेल याचा पोलीस तपास करत आहेत मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा अशा पद्धतीने मृतदेह आढळून येणाऱ्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले ही आत्महत्या आहे की ही हत्या आहे याचा पोलीस सखोल तपास करत आहेत मात्र या घटनेने पोलीस सुद्धा हादरून गेले आहेत.