धक्कादायक ! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीचा झाला स्फोट; आणि ७ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडले असे काही.
इलेक्ट्रिकचा बाईक वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे , चार्गिंग करून ही गाडी आपण जवळच्या प्रवासासाठी वापरू शकतो ,मात्र याच बाईकच्या बॅटरी स्फोट होऊन एक दुर्घटना घडली, वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली. दरम्यान त्या आगीत भाजल्याने सात वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
शब्बीरचे वडील शरफराज बेडरूममध्ये झोपले होते. तर शब्बीर आणि त्याची आजी हॉलमध्ये झोपली होती. यादरम्यान चॅर्जींग लावलेल्या बॅटरीने अचानक पेट घेतला आणि घराला आग लागली. दरम्यान शब्बीर त्या आगीत भाजला गेला. शरफराजला तातडीने जवळच्या रुग्णाल्यात नेले परंतु त्याने अखेरचा श्वास घेतला.
याबाबत शब्बीरचे वडील शरफराज म्हणाले कि, 23 तारखेच्या पहाटे 2 वाजून 30 मिनीटांनी त्यांनी आपल्या इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरी काढून चॅर्जींग लावले होते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी कमीतकमी 3 ते 4 तास लागतात. याचा अंदाज घेत शरफराज यांनी बॅटरी आपल्या घरातील हॉलमध्ये लावली होती. त्यामुळेच बॅटरी चार्ज करून झोपायला गेलो, अचानक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मी झोपेतून उठून हॉलमध्ये आलो तेव्हा मला मोठा आवाज ऐकू आला, हॉलला आग लागल्याचे दिसले, छताच्या पंख्याला आग लागली होती.
याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चार्जींग सुरु असताना बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.