ग्रामपंचायतच्या गेटसमोरच कर्मचाऱ्यासोबत घडले असे काही, कि स्वतःहून पोलीस ठाण्यात जाव लागलं.
अनेकदा आपल्यात मतभेद होतात. या मतभेदाचं रुपांतर भांडणातही होतं. पण त्या भांडणाने टोक गाठला तर प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाऊ शकतं याची अपण कल्पना देखील करु शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा शेवटी जीव असतो. आपल्याला जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला हवा. कुणाचीही जीव घेणं सोपं नाही. मनभेद, भांडणातून निर्माण झालेल्या संघर्षातून तर अजिबात कुणाचा जीव घेऊ नये. अन्यथा त्याचे दुष्परिणाम दोन्ही बाजूच्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना भोगाव्या लागतात. गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक एक घटना घडली आहे. जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून गावातील ग्रामपंचायत कर्मचार्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. आरोपीने इतकं भयानक कृत्य करायला नको होतं, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. आरोपीने 51 वर्षीय परिचर यशवंत मेंढे यांना धडक दिली. त्यानंतर गाडी मागे-पुढे करत त्यांना चिरडलं. या हल्ल्यात मेंढे यांचं दुर्देवी निधन झालं आहे.ते नेहमी प्रमाणे आपलं काम आटोपून घरी जात होते.
या दरम्यान ग्रामपंचायत गेटसमोर 38 वर्षीय आरोपी प्रवीण नेवारे याने आपली टाटा सुमो गाडीने यशवंत मेंढे यांना जोराची धडक दिली. आरोपी तेवढ्यावर थांबला नाही. त्याने गाडी पुन्हा मागेपुढे करत मेंढे यांना गाडीखालून अक्षरश: चिरडलं.आरोपी त्या गाडीने हल्ला करुन पळून गेला.यशवंत मेंढे यांना रस्त्यावर धारातीर्थ पडलेलं पाहून काही नागरिकांना धक्का बसला.
त्यांनी तातडीने यशवंत यांना उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत .