Shocking Video भरधाव येणाऱ्या बाईकला धडकून चाकात अडकलं माकड अन्..
वाहनांना अनेक वेळा प्राणी आडवे पळत असतात, त्यामुळे अपघात ही होतात वेळ प्रसंगी प्राण्यांना जीवं ही गमवावा लागतो,मात्र काही वाहन धारक अश्या निष्पाप प्राण्यांना वाचवतात. माकडांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या विचित्र, क्युट हरकती सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तर काही वेळा माणसांना त्रास देताना ते दिसतात. पण सध्या माकडाचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. एक माकड चक्क एका बाईकच्या चाकात अडकलं आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धक्का बसेल.
सोशल मिडीयावर viral होणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बाईकच्या पुढच्या चाकात एक माकड अडकलेलं दिसतं आहे. हे माकड तिथं कसं अडकलं हे माहिती नाही. माहितीनुसार, बाईक भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होती. त्यावेळी माकड रस्ता ओलांडत होतं. माकड या बाईकला धडकलं आणि ते दूर फेकलं जाण्याऐवजी बाईकच्या चाकात अडकलं. बाईकचालकाने कसाबसा गाडीला ब्रेक लावला आणि गाडी थांबवली.त्यामुळे ते माकड वाचल.
या माकडाला वाचवण्यासाठी चक्क मॅकेनिकला बोलावाव लागल, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता माकडाला चाकातून बाहेर काढण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मॅकेनिकच्या मदतीने बाईकचं पुढील चाक काढण्यात आलं आणि माकडाला तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
एका यू ट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्ही ही बाहेर फिरत असताना असे प्रसंग आले तर प्राण्यांना वाचवा. पर्यावरणाच संवर्धन करू.