कालच शाखेचं उद्घाटन केलं, आणि आज मनसे शहरप्रमुखासोबत भलतेच घडले. पहा सविस्तर बातमी.

सध्या सर्वत्र राजकारणातील पक्षांची चळवळ लागलेली आहे. यात मनसेमध्ये देखील आपला पक्ष मजबूत व्हावा यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्रातील मनसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. ही बातमी देखील मनसेच्या संदर्भातलीच आहे. ही बातमी परभणीतून हाती येते. परभणी ते धक्कादायक असा प्रकार घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे.
या शहर प्रमुखाचे नाव सचिन पाटील असा आहे. त्यांच्या हत्येचं कारण अद्यापही समजू शकल नाहीये. मात्र या हत्या करण्यापूर्वी गंगाखेड या ठिकाणी कालच मनसेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाला होता. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेचच शहर प्रमुखाची हत्या होते. त्यामुळे या प्रकरणाला काहीस वेगळे वळण मिळू शकतात. किरकोळ कारणातून मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या मित्रानेच त्यांचा खून केला.
मात्र खुनाच कारण अद्यापही समजू शकले नाही. अशी माहिती प्राथमिक स्तरावरती मिळत आहे. शिवराम नगर या ठिकाणी रात्री गणपती मंडळात आपला मित्र सोबत ते बसले होते. दरम्यान पहाटे तीन ते चार वाजण्याच्या वेळी त्यांचा अज्ञात कारणावरून मित्रासोबत वाद झाला. या वादातूनच त्यांचा खून करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अजूनही अस्पष्ट आहे.
सकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आली. नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करण्यात आला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेने परभणी शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सचिन पाटील यांच्या खुनाचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासामधून खुनाचे खरे कारण समोर येणार आहे. मात्र आदल्या दिवशी शाखेचे उद्घाटन आणि दुसऱ्या दिवशी खून हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे परिसरातील मनसैनिक शोक व्यक्त करत आहेत.