मयत ताई संदिपान सावंत यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ मदत द्यावी.
वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बापू नाना आहेर यांची मागणी.
आष्टी ( प्रतिनिधी — गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सांगवी येथील ताई संदिपान सावंत वय 30 वर्षे महिला आपल्या मुलासोबत माहेरी आई-वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या , कामानिमित्ताने आई-वडिला सोबत त्या शेतात गेल्या असता अचानक वादळी वारा पाऊस सुरू होऊन विजांचा कडकडाट होऊन वीज ताई संदिपान सावंत यांच्या अंगावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ताई सावंत यांच्या पाश्चात पती संदिपान, अनिकेत व आतिश व सासू सासरे असून सावंत परिवाराची परिस्थिती अत्यंत हलकीची असून त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत होत्या।, पती संदिपान लक्ष्मण सावंत हे अपंग असून मुलं लहान व सासू-सासरे वृद्ध असल्याने कुटुंबांची सर्व जिम्मेदारी ताई सावंत यांच्या वरतीच होती.
ताई सावंत यांच्या अंगावरती वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावंत परिवारात शोक कळा पसरली असून दुःखाचा डोंगर उभा राहिला असून सावंत परिवारातील करती व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावंत कुटुंबाने आता जगायचे कसे ? असा प्रश्न उभा राहिला आहे.
माय बाप सरकारला अशी विनंती करण्यात येते की , मयत ताई संदिपान सावंत यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करून तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते बापू नाना आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.