सासू-सासऱ्यांनी नवरदेवाचं केलं असं स्वागत की VIDEO झाला तुफान व्हायरल.
जावईबापू हे सासरवाडी चे लाडाचे असतात, जावईबापूंचे अनेक लाड केले जातात, कारण त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी नांदायचं असतं. त्यामुळे अनेक सासुरवाडींमध्ये जावयाचे लाड होतात अशाच एका जावयाचे चे स्वागत दिमाखात करण्यात आले, ते पाहून अनेक जण आवाक झाले. तर हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया वरती व्हायरल होतं आहे,थोडासा गमतीशीर व्हिडिओ आहे. एक वेगळे काहीतरी केलं जातंय मात्र तरी देखील लोकांना हा व्हिडिओ आवडतो बऱ्याचदा आपण जावयांचा औक्षण करून स्वागत करतो मात्र या व्हिडिओमध्ये भलतंच काहीतरी केले असं पाहायला मिळते,
नवरदेव वरात घेऊन लग्नमंडपात आला की त्याचं स्वागत केलं जातं. त्याला ओवाळलं जातं, त्याची नजर काढली जाते, त्याला मिठाई भरवली जाते. पण एका नवरदेवाचं असं स्वागत करण्यात आलं आहे की लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लग्नात नवरदेवाच्या अशा स्वागताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नवरदेवाचं स्वागत चक्क सिगारेटने करण्यात आलं आहे. त्याचे होणारे सासू-सासरे म्हणजे नवरीबाईच्या आईवडिलांनीच त्याला सिगारेट दिली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेव एका खुर्चीत बसला आहे.
त्याच्यासमोर त्याचे सासू-सासरे आहेत. सासू नवरदेवाच्या तोंडात सिगारेट देते आणि सासरा माचिसने ती सिगारेट पेटवतो. नवरदेव एक कश घेतल्यासारखं करतो आणि नंतर सिगारेट तोंडातून बाहेर काढतो.ब्लॉगर जुही पटेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्ट करताना तिने सांगितलं, लग्नाची एक नवी परंपरा पाहायला मिळाली. ज्यात सासू आपल्या जावयाचं स्वागत मिठाई, विडी आणि पान देऊन करते.
दक्षिण गुजरातच्या काही गावात अशी परंपरा आहे. हे फक्त एक परंपरा म्हणून केलं गेलं आहे. नवरदेवाने सिगारेट ओढलेली नाही, ना सासऱ्याने ती पेटवली आहे.माहितीनुसार तशी ही प्रथा जुनी आहे. म्हणजे आधी विडी देऊन स्वागत व्हाययचं पण आता विडीची जागा सिगारेटने घेतली आहे.लग्नाशी संबंधित अशा बऱ्याच प्रथा, परंपरा आहेत, ज्या इतरांना विचित्र वाटतात. काही ठिकाणी खास ड्रिंक पाजली, जाते काही ठिकाणी पानही भरवलं जातं.
तुमचं या परंपरेबाबत काय म्हणणं आहे, तुम्ही अशी परंपरा पाहिली आहे का? किंवा अशा काही विचित्र परंपरेबाबत तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.