श्रीगोंद्यात घडल धक्कादायक: घराजवळ येऊन शिवीगाळ व दमदाटी केली आणि राहत्या घराच्या छपराला…
गवते वस्ती येथील मोहिनी शरद काळे व त्यांचे कुटुंबियांच्या राहत्या घराच्या छपऱ्याला आग लावून पेटवून दिले व कुटुंबियातील सर्वांना मारहाण केलेली असून आरोपी धनु पोपट गायकवाड व अक्षय प्रकाश शिपळकर यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेले असता टाळाटाळ करत असून तक्रार घेतली जात नसून न्याय मिळण्यासाठी काळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी मोहिनी शरद काळे, शरद काळे, जिजाबाई काळे, रोहित काळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की काळे कुटुंबियांच्या राहत्या घराच्या जागेशी आरोपींचा कुठलाही संबंध नसून आरोपी हे बरेच दिवसापासून काळे कुटुंबीयांना सदरील ठिकाणावरून निघून जा या जागेशी तुमचा एकही संबंध नाही असे म्हणून धमकावत असून कुटुंबास वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत असून 12 मे 2023 रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वरील दोन आरोपी हे घराजवळ येऊन शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून तुमचा कायमचा काटा काढून टाकू अशी धमकी शिवीगाळ केली व आमच्या राहत्या घराच्या छपऱ्याला आग लावली आम्ही त्याना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने व गजाने आमच्या कुटुंबातील सर्वांना मारहाण केली व तेथून निघून गेले
सदरील आगीत संपूर्ण छप्पर जळून खाक झाले असून शाळेचे कागदपत्रे तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळाली यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून झालेल्या अन्यायाबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता पी.आय. भोसले यांनी उद्या या म्हणत तीन-चार दिवस रोज बोलावून आमची तक्रार दाखल करून घेतली नसून लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेण्यात यावी अन्यथा 24 मे 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काळे कुटुंबीय आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.