जरंडी मधील आठवडी बाजाराचे आता स्थलांतरण होणार आहे. पहा बातमी सविस्तर.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
वर्दळ आणि वाहतुकीस अडथळा ठरणारा जरंडीचा आठवडे बाजार आता प्रशक्त जागेत स्थलांतरित होऊन नवीन बाजार जागेवर भाजी विक्रेत्यांसाठी बाजार ओट्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्राथमिक शाळेच्या समोर असलेल्या बस स्थानक च्या रस्त्यावर दूतर्फा जरंडीचा आठवडे बाजार भरत होता परंतु दुतर्फा भाजी विक्रेते आणि ग्राहक यांची तारांबळ होत असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत यामुळे जरंडी ग्रामपंचायत ने आठवडे बाजाराच्या स्थलांतराचा निर्णय घेतला.
शनिवारी नवीन स्थलांतरित जागेवर येणारे अडथळे दूर करण्याची मोहीम ग्रामपंचायतच्या पथकाने हाती घेऊन या नवीन जागेच्या समोर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना चार दिवसाची मुदत देत अतिक्रमण हलवण्याचा सूचना दिला त्यामुळे आता आठवडे बाजार मोकळा श्वास घेऊन भाजीपाला विक्रेत्यांना बाजार ओटे मिळणार आहेत.
ग्रामविकास अधिकारी सुनील मंगुळे यांनी आगामी दोन महिन्यात नवीन जागेत बाजार ओटे तयार करून आठवडे बाजार स्थलांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले या नवीन जागेचे अतिक्रमण दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पथकाने अतिक्रमणधारकांना तातडीने जागा मोकळी करून देण्याची सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे उपसरपंच संजय पाटील ,मधुकर पाटील,दिलीप पाटील, बनेखा,तडवी अमृत राठोड मधुकर सोनवणे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.