नवरा-बायकोचा हा डान्स इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ; पाहताना नजर हटणार नाही, एकदा व्हिडियो पहाच
पूर्वीच्या काळी महिला डोक्यावर पदर घेऊनच सर्वत्र वावरत असे, वडिलधाऱ्या समोर येन महिला टाळत असे ,कालांतराने सर्व काही बदल शिक्षण घेऊन विचार सारणीत बदल होत गेले जाचक असणार्या रिती शिथिल झाल्या महिलाही सर्वा सोबत आनंदाने सहभागी होऊ लागल्या,आता याच महिला सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतात, त्याचं हे बदललेलं रूप सर्वांनी स्वीकारलं आहे, घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.
अलीकडे तर सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट असे डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एका महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही संबंधित महिलेचं डान्सचं टॅलेंट पाहून तिचं कौतुक करावंसं वाटेल. हेमा शर्मा नावाच्या इन्स्टा प्रोफाइलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे.
व्हिडिओमध्ये गोविंदाच्या गाण्यावर एका महिलेनं अप्रतिम डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सध्या सोशल मीडियावर संबंधित महिलेचं कौतुक अनेक जण करताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की तो कुठल्या तरी फॅमिली फंक्शनचा आहे, जिथे एक पुरुष एका महिलेसोबत डीजे फ्लोअरवर ‘किसी होटल में जाएं…’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय,
या व्हिडिओमधल्या महिलेच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. ही महिला इतकी सुंदर नाचतेय, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे आजकाल अनेक जण रातोरात स्टार बनत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामधल्या महिलेच्या डान्सची खूपच चर्चा सुरू आहे.