काम शोधण्यासाठी आलेल्या महिलेसोबत पुण्यातील स्वारगेट मध्ये घडला असा प्रकार.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि समृध्द असे शहर असून त्या सारख्या शहरामध्ये असा काही प्रकार घडणे अपेक्षित नसते पण असा काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.
बसमध्ये महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. दिल्ली या ठिकाणी घडलेला प्रकार सबंध देशांना पाहिला मात्र याचीच पुनरावृत्ती पुण्यात आलीय. पुण्यामध्ये महिलेचा पती बस मधून खाली उतरल्यानंतर ही बस सुरू होते आणि त्यानंतर जे काही झाले त्याने मन सुन्न होत.
मिळालेल्या माहितीनुसार पती व पत्नी हे वाशिम येथून काम शोधण्यासाठी पुणे शहरात आले होते शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात ते झोपण्यासाठी जागा शोधत होते त्यावेळी एक ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने त्या दोन्ही नवरा बायकोला माझ्या बसमध्ये झोपा आता एवढ्या उशिरा रात्री तुम्हाला जागा कुठे मिळणार असं सांगितलं. आणि त्या आरोपीवर या दोघांनी विश्वास ठेवून त्या बस मध्ये आराम करायचे ठरवले त्या पीडित महिलेचा पती बस मधून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि याच संधीचा फायदा घेऊन त्या चालकाने बस दुसरीकडे नेली आणि त्या महिलेस अशी धमकी दिली की, ” जर तू आरडाओरडा केला तर मी तुला जिवंत मारून टाकेल ” असं म्हणत त्याने स्वारगेट जवळ फुटपाथच्या बाजूला बस थांबवून त्या महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर त्या आरोपी चालकाने कात्रज बस स्टॉप जवळ कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा एकदा त्या महिलेवर बलात्कार केला यानंतर त्या बसच्या चालकाने त्या महिलेला दोनदा बलात्कार करून झाल्यानंतर आपल्या बसच्या खाली उतरून दिले आणि तेथून तो निघून गेला.
नंतर त्या पीडित महिलेने स्वारगेट मधील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या विरोधात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला त्या आरोपीला बंद करण्यासाठी पोलिसांना यश आलं. पुण्यातील वर्दळीचा भाग असलेला स्वारगेट परिसरामध्ये एक ट्रॅव्हल्स बस चालक हा एका महिलेवर बलात्कार करतो ही एक धक्कादायक बाब समोर येते आहे तो चालक बसमधील महिलेला पळून येतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. असा गुन्हा करणाऱ्याला पोलिस काही वेळा मध्येच अटक देखील करतात.