” माझ्या गाडीला हात तर लावून दाखवा, तुमच्या….” – संतोष बांगर.
सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे घडताना आपण पाहत आहोतच. यात आता शिवसेनेचे बंडखोर आमदार यांनी देखील मत मांडायला सुरुवात झाली आहे.
शिवसेनेकडून त्यांना गद्दार म्हटलं जातं आणि आपण गद्दार आहोत का नाही याचं जहरी प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. बंडखोर आमदार संतोष बांगर हे हिंगोली चे आमदार आहेत. ते म्हणतात, तुमच्या घरापुढे गाडी आणून लावतो. गाडीच्या काचाला हात लावून दाखवला तर आमदारकीचा राजीनामा देईल. असं त्यांनी मांडी ठोकत प्रति अहवाल शिवसेनेला दिले.
याचबरोबर आमदार बांगर यांनी शिवसेनेचे पदे मिळवण्यासाठी वसुली होते. मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात असा धक्कादाय खुलासा केला. संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाला एक हजार लोकांच्या जीवनाचा खर्च, क्रिकेट सामन्यांच्या इनामांचा एक लाख रुपये आणि खासदार विनायकराव त्यांना भेट म्हणून गळ्यातील सोन्याची साखळी माझ्याकडून घेतली. असा धक्कादायक आरोप देखील बांगर यांनी केला.
त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार यांच्यामध्ये आता शाब्दिक संघर्ष पेटायला सुरुवात झाली आहे. आम्ही शिवसैनिक आहोत मात्र आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असं शिंदे गटातील बंडखोर आमदार म्हणतात. शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता काय भूमिका घेतात. शिवसेनिक आणि बंडखोर आमदार यांच्यात कसा समतोल राहते की हा संघर्ष पेटत जातोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.