मानोरी ग्रामपंचायतला विखे, कर्डिले व तनपूरे एकत्र.
प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी.
अब्बास भाई पठाणला (दयावानल) रोखण्यासाठी तीन महारथींनी आखली व्युव्ह रचना. ११ पैकी ८ ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत.
राहुरी तालूक्यातील अकरा ग्रामपंचायत ची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी झाल्याचे पहावयास मिळाल्या. मानोरी येथील माजी सरपंच अब्बासभाई ऊर्फ दयावान यांनी दोन्ही पक्षाला डावलून स्वतंत्र पॅनल उभा केलाय. तर त्यांना शह देण्यासाठी त्या ठिकाणी विखे, कर्डिले व तनपूरे गट एकत्र झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याची चर्चा तालूक्यात सुरू झाली आहे.
राहुरी तालूक्यातील आरडगाव, केंदळ खुर्द, सोनगाव, ताहाराबाद, तुळापूर, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, कोंढवड, मांजरी, ब्राम्हणगाव भांड, मानोरी या अकरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ८८ तर सदस्य पदासाठी ४९३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हार खुर्द येथे सरपंच पदासाठी ५ तर १४ सदस्य पदासाठी ३३ उमेदवार तर एक जागा बिनविरोध झाली.
खडांबे खुर्द येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २७, मांजरी येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २२, ब्राम्हणगाव भांड येथील सरपंच पदाची जागा बिनविरोध तर सदस्य पदाच्या ७ जागां पैकी ५ जागा बिनविरोध तर २ जागांसाठी ४ उमेदवार, कोंढवड येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या ९ जागांसाठी २२, सोनगाव येथे सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदाच्या ११ जागांपैकी २ जागा बिनविरोध तर ९ जागांसाठी १८, आरडगाव येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या ११ जागाांसाठी २९, तुळापूर येथे सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदाच्या ७ जागां पैकी १ जागा बिनविरोध तर ६ जागांसाठी १३, मानोरी येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या १३ जागांसाठी ३८, केंदळ खुर्द सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदाच्या सर्व ९ जागा बिनविरोध, ताहाराबाद येथे सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदाच्या ११ जागांपैकी २ बिनविरोध तर
९ जागांसाठी १९ असे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
विखे, तनपूरे व कर्डिले गटाबरोबर वंचित चे कार्यकर्ते दंड थोपटून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचा ११ पैकी ८ ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. त्यामुळे ८ ग्रामपंचायतमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शेवटच्या दिवशी ४८४ अर्जा पैकी १५९ अर्ज माघारी गेल्याने ११ ग्रामपंचायतीच्या एकूण ११५ सदस्य पदा पैकी २० सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ९५ जागांसाठी २२५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. तसेच सरपंच पदासाठी ८६ अर्जा पैकी ५६ अर्ज माघारी गेल्याने आणि एक बिनविरोध झाल्याने २९ उमेदवार सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान मानोरी येथे अब्बास भाई शेख उर्फ दयावान यांचे तनपूरे गटाबरोबर सूत जूळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला. त्यांना शह देण्यासाठी त्या ठिकाणी विखे, तनपूरे व कर्डिले गट एकत्र आल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत अकरा ग्रामपंचायतची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली असून याकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे.