” तू काळा आहेस, म्हणून मी लग्न करणार नाही. काळ्या रंगामुळे माझ्या…” लग्नाआधी नवरीने पहा कसा केला अपमान.
कोण कधी काय बोलेल सांगता येत नाही. आपला जोडीदार कसा असावा या बद्दल मुलींच्या बर्याच इच्छा अपेक्षा असतात. उदा. चांगला पगार असावा, गाडी असावी, मोठा बंगला असावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि तो जोडीदार आपल्याला शोभणारा असावा. या बाबतीत देखील असे काही घडले आहे. या बातमीतील नवरीने चक्क नवरदेवाला अतिशय खालच्या थराला जाऊन बोलली आहे.
माणसाला त्याचं रंग-रूप नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. त्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं. अशा परिस्थितीत एखाद्याला त्याच्या रंग-रूपावरून हिणवणं योग्य ठरत नाही. तरीही अनेक जण तसं चिडवतात. कधी कधी एखाद्याकडून एखाद्याला असे टोमणे मारले जातात, की समोरची व्यक्ती केवळ दु:खी होत नाही, तर कधी कधी त्यावरून मोठं भांडणही होतं.
असंच एका मुलाच्या बाबतीत झालं. लग्न ठरल्यानंतर त्याच्या नियोजित वधूने होणाऱ्या वराचा त्याच्या रंग-रूपावरून अपमान केला आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान वधूने वराला एकांतात बोलावलं आणि त्याला जे सुनावलं, त्यावरून दोघांच्या कुटुंबात चांगलीच खडाजंगी झाली. ” तू काळा आहेस, म्हणून मी लग्न करणार नाही, तुझ्या काळ्या रंगामुळे मित्र-मैत्रिणी चिडवतील.” असे नियोजित वधूने सांगितलं.
जेव्हा तो मुलगा आपल्या कुटुंबासमवेत एका कार्यक्रमासाठी मुलीच्या घरी आला होता, तेव्हा त्या मुलीने त्या मुलाला एकांतात बोलावून त्याच्या रंगावरून त्याला नको ते सुनावले. ती त्याला म्हणाली, ” तुझं शिक्षणही कमी आहे व तू दिसायलाही सुंदर नाहीस. त्यात तुझा रंगही काळा आहे. यावरून मला माझ्या मैत्रिणी फार चिडवतील. म्हणून मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.” एवढंच नाही, तर मुलीचं म्हणणं असं होतं, की त्या मुलानेच आपल्याला लग्नास नकार द्यावा, नाही तर ती लग्नाच्या अगोदरच पळून जाईल.
हे सारं ऐकल्यावर कोणता मुलगा लग्नासाठी तयार होणार आहे ? एवढा अपमान झाल्यानंतर मुलाने हे नातं तोडून लग्नास नकार दिला. मुलीच्या कुटुंबीयांना याबाबतची पूर्ण हकीकत माहिती नसल्याने, मुलाने अचानक दिलेल्या नकारामुळे खूप गोंधळ घातला. त्यांच्यात भांडण झाली तसेच, त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार करायची धमकी देखील दिली. मुलाच्या कुटुंबीयांच्या मते, मुलीच्या घरवाल्यांनी तडजोड म्हणून 2 लाख रुपये मागितले व पैसे दिले नाही म्हणून मारपीट करून त्यांचं सगळं सामानही घेतलं. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.