आजकाल चाललंय तरी काय ? मजुरी करुन बायकोला शिकवलं, शिक्षिका बनताच मुख्याध्यापकाबरोबर पळाली.
एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक यांच्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या प्रकरणाचा परिणाम सध्या देशभरात पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणामुळे विवाहीत महिलांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत असल्याचं कहीजण म्हणत आहेत. आता आणखी एका महिलेने शिक्षक बनताच आपल्या नवऱ्याला धोका दिल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
एका व्यक्तीने त्याच्या बायकोला शिकवलं आणि तिला शिक्षिका बनवलं, पण ती शाळेच्या मुख्याध्यापकाबरोबर पळून गेल्याचा आरोप तिच्या नवऱ्याने केला. मिळालेल्या माहितीनुसार वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चंदनकुमारने आरोप केला आहे की, लग्नानंतर १२ वर्षांनी त्याने बायकोला शिकवलं, तिला शिक्षिका बनवलं, शिवाय यासाठी त्याने मजूरी काम केलं, प्रसंगी कर्जही काढले. मात्र, बायको शिक्षिका बनताच शाळेच्या मुख्याध्यापकाबरोबर पळून गेली.
१३ वर्षांपूर्वी सरिताबरोबर त्याचे लग्न झाले होते. सरिताला लग्नानंतरही शिक्षण घ्यायचे होते. यासाठी त्याने मजुरीचे काम केले, कर्ज घेतले आणि सरिताला शिकवले. २०२२ मध्ये तिला एका प्राथमिक शाळेत नोकरीही मिळाली. शाळेचा मुख्याध्यापक राहुल कुमार सरितावर लक्ष ठेवून होता.नंतर मुख्याध्यापकाने त्याच्या घराजवळ सरिताला भाड्याने घर मिळवून दिले. एवढेच नव्हे तर चंदनने तक्रारीत या दोघांमध्ये संबंध असल्याचंही म्हटलं आहे.
संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत असल्याचे बीडीओ यांचे म्हणणे आहे. तसेच शिक्षिका फरार नाही तर तिने २ महिन्यांपासून रजेचा अर्ज दिला असून ती सध्या शाळेत येत नाही. शिवाय तिच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र या तक्रारीमुळे आणखी एक ज्योती मौर्य आणि आलोक यांच्यासारखं प्रकरण समोर आल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.