नवरात्री स्पेशल 2022 : शववाहीका चालवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारी कोण आहे ही दुर्गा ? पहा बातमी सविस्तर
एक स्त्री ही क्रूर होऊ शकत नाही, तिच्यामध्ये ममता, वासल्य हे पूर्णपणे भरलेलं असतं. त्यामुळे तिला क्रूरपणे वागणं जमत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे अत्यंत भयानक कामे स्त्रिया करू शकणार नाही असे समाजाकडून म्हटलं जातं मात्र कोरोना काळात एका स्त्रीचा दुर्गा अवतार पाहायला मिळाला, तीने खुद्द शववहिका चालवून मृतदेहांवरती आपल्या हाताने अंत्यसंस्कार केले .
प्रिया प्रकाश शिंदे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीचे नाव आहे. कोल्हापुरातल्या जाधववाडी या ठिकाणी ती राहते. बीएससी बॉटनी या विभागातील शिक्षण पूर्ण झालं. ती एक योगा प्रशिक्षक आहे. कोरोना काळात ॲम्बुलन्स मध्ये मृतदेह घेऊन जात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले,
ती बोलताना सांगते की माझ्या वडिलांचे मित्र त्यांचा कोरोनामुळे निधन झाले त्यांच्याजवळ सीपीआरमध्ये मी आणि बाबा थांबलो होतो , शववाहिका यायला जवळजवळ पंधरा तास लागणार होते. कर्मचारीचा तुटवडा होता तिथे उभा असताना ठरलं की माणसं मेल्यावरही त्याचे हाल संपत नाहीयेत त्यामुळे आपण ॲम्बुलन्स ड्रायव्हर व्हायचं, लायसन आहे त्यामुळे तिने या संधीचा सोनं केलं.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये ही विचारलं आणि फायर स्टेशनला एके दिवशी फोन आला की भवानी फाउंडेशननेचे हर्षल सुर्वे यांनी व्हॅन दिली आहे , तिथे स्वतः काम करणार आहेत त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या कामात जायचं हे प्रिया ने ठरवलं . धाडसाने ती पुढे गेली तिला वाटलं आपला आणि डेड बॉडी चा काही संबंध येणार नाही. आपण फक्त ॲम्बुलन्स चालवणार सुरुवातीला हे काम करताना भीती वाटली मात्र हर्षल दादांनी तिला बळ दिलं. पहिलाच दिवशी ११बॉडी पोहोचवले, तिथे अंत्यसंस्कारही केले . एके दिवशी तर 24 बॉडी पोहोचवल्या आणि त्यावरती अंत्यसंस्कार केले हे काम आटवून घरी यायला 12 देखील वाजले घरी आल्यानंतर फक्त आई-बाबांचा चेहरा पाहिला मिळायचा चार महिने मी कोणाच्याही जवळ केले नाही असं त्या सांगत होत्या.
कोरोनाच्या काळात जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रिया पाटील यांनी धाडस दाखवत ॲम्बुलन्स चालवून मृतदेहवर अंत्यसंस्कार करण्यासारखं समाज उपयोगी काम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जाते . याचं नवरात्र उत्सवानिमित्त या नवदुर्गाच्या स्त्री शक्तीचा सर्वत्र जागर केला जात आहे .