नंदुरबारमध्ये बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; पाच वर्षाची चिमुकली देत आहे मृत्यूशी झुंज..

नंदुरबार मधील शहादा या शहरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. शहादा बायपास रस्त्यावरती खाजगी बस आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सतरा जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या मध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यान उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आलं असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्यास समजते. शहादा तालुक्यातील रोजगारांसाठी मजुरांच स्थलांतर सुरू आहे या स्थलांतरादरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
गुजरात मधील सौराष्ट्र येथून घेऊन येणारी बस व टेम्पोचे समोरासमोर धडक झाली आहे. शहादा बाहेरून येणाऱ्या बायपास रस्त्यावरती नवीन बस स्थानक लगत हा अपघात झालाय. ही धडक इतकी भयानक होती की, अपघातात पाच जण जागीच मृत्यूमुखी पडले. तर जखमी मजुरांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे.
पाच वर्षे चिमुकली शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूची झुंज देत आहे. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि या घटनेची सखोल तपास आता पोलीस करत आहेत. सतरा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते तर जखमींचा आकडा देखील वाढू शकतो.