नवनीत राणा यांच्यावर गृहमंत्री फडणवीस कारवाई करणार ? पहा बातमी सविस्तर.

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये एका युवतीचा अपहरण झाल्याची तक्रार घेऊन खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. लव जिहाद प्रकरण असल्याचा आरोप त्यांनी केला होता , पोलीस ठाण्यातच याबाबाबत चौकशी करत त्यांनी हुजत घातली होती, त्या ठिकाणी खासदार राणा यांचा रौद्ररूप पाहून पोलीस कर्मचारी हे चांगलेच गोंधळून गेले. पण अखेर त्या ती युवतीनेच स्वतःच्या मर्जीने घरातून निघून गेल्याचे स्पष्ट केलं.
त्यामुळे यावेळी राणा चांगल्याच तोंडघशी पडल्या, ह्या सर्व प्रकारानंतर पोलिसांच्या संघटनेने नवनीत राणा यांचा जाहीर निषेध केला, नवनीत राणा यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हा दाखल व्हावा, तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे टाळावे आणि त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्यावतीने करण्यात आली.
या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई करतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे, तर या सगळ्या प्रकाराची तपासणी करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनीत राणा यांच्यावरती कारवाईचे आदेश देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजपाकडून महाराष्ट्र पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. नवनीत राणा यांच्या प्रकरणात महेश तापसे यांनी अनेक आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या.