यशने मिळवलं नेत्र दीपक यश; दृष्टिहीन यश YouTube वरून कोडिंग शिकला, मिळवली Microsoft मध्ये नोकरी.
एखादी गोष्ट मिळवायची ठरलं तर ती मिळवलीच पाहिजे, मग त्यासाठी काहीही करण्याची वेळ आली तरी चालेल ,आपल्या अंगी जिद्दीची ,चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती असेल तर खऱ्या अर्थाने आपण जे स्वप्न पाहिले ते आपण पूर्ण करू शकतो. यासाठी वय, शिक्षण आणि शारीरिक सुदृढता महत्वाची राहत नाही. याच गोष्टीला सिद्ध करत इंदोरच्या एका विद्यार्थ्यांनं कमाल दाखवली आहे.
कोणताही व्यावसायिक कामाचा अनुभव नसताना, यश सोनकिया, मध्य प्रदेशातील इंदूर येथील 25 वर्षीय पदवीधर युवकाने मायक्रोसॉफ्ट या ड्रीम फर्ममध्ये नोकरी मिळवली आहे. आता लवकरच एका मोठ्या टेक फर्ममध्ये सॉफ्टवेअर अभियंता बनणार आहे. विशेष म्हणजे यश हा दृष्टिहीन आहे. त्यामुळे भल्याभल्यांना लाजवेल अस काम त्यानी करुन दाखवलं आहे.
आयुष्यात शिक्षण आणि संघर्ष या काही सोप्या गोष्टी नव्हत्या मात्र त्या मिळवायच्या म्हणून तडजड करत मोठी कष्ट करत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यशच्या वडिलांनी जे शहरात कॅन्टीन चालवतात, त्यांनी आपल्या मुलाला विशेष गरजा असलेल्या शाळेत 5 वी पर्यंत शिक्षण दिले आणि नंतर त्याला नियमित शाळेत दाखल केले.
गरिमा विदया विहार, इंदूर येथून 2017 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण केल्यानंतर यशने जेईई मेन पास करून बीटेक इन कॉम्प्युटर ही पदवी प्राप्त केली.
2021 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर हातात कोणतीही नोकरी नसताना, यशने स्वतः चे कौशल्य वाढवणे आणि YouTube वरून कोडिंग शिकणे सुरू केले. असे करणे त्याच्यासाठी सर्वात कठीण होते कारण तो दृष्टिहीन आहे. जन्मजात काचबिंदूमुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली अनुवांशिकदृष्ट्या निर्धारित विकृतींमुळे एक दुर्मिळ आजार त्याला होता. त्यावर मात करून आज त्याने एवढे मोठे यश संपादन केले आहे.