सर्व प्रकारचे चोर तुम्ही पहिले असतील पण असा संस्कारी चोर पहिला आहे का ? पाहा त्याने मंदिरात काय केलं.
कोण कधी कसा व्हायरल होईल सांगता येत नाही. आजकालच्या डिजिटल जगात चोर देखील सुटला नाही. आतापर्यंत दरोडे टाकणारे, चोऱ्यामाऱ्या करण्याचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील. पण कधी एका चोराने चक्क देवाच्या पाया पडून मग चोरी केली आहे असा पहिले नसे. हो असाच काहीसे एका CCTV मध्ये कैद झाले आहे याबद्दल जाणून घेऊ,
तुम्हाला नकारत्मक करणाऱ्या बातम्या येत असतीलच पण ही बातमी जरा वेगळी आहे , कारण चोरी, मारमारी या घटना नी आपण विचलित होतो पण या बातमीतील चोर हा खरा प्रामाणिक आहे . तो देवळात जातो चोरी करायला पण पुढे काय होत पाहा, मंदिरात जाऊन चोरी करण्याआधी देवीची माफी मागणारा चोर तुम्ही कधी पाहिलाय का? मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये असा चोर आणि त्याची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मंदिरातील दानपेटी चोरी करण्यासाठी चोर पोहोचला. मंदिरात गेल्यावर त्यानं देवीसमोर हात जोडून माफी मागितली. त्यानंतर त्यानं दानपेटी लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. जबलपूरच्या माढोताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सूखा गावात लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराचं कुलूप फोडून एक चोर आत शिरला.
मंदिरात शिरल्यानंतर चोर देवीच्या मूर्तीसमोर पोहोचला. त्यानं देवीला पाहून दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. हात जोडून तो काही वेळ देवीसमोर उभा राहिला. त्यानंतर त्यानं शेजारीच असलेली दानपेटी काळजीपूर्वक उचलली आणि तिथून पसार झाला.